शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात न भेटल्याने मुख्य सचिवांविरुद्ध याचिका; तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

By यदू जोशी | Updated: October 8, 2017 03:05 IST

राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आपल्याला मंत्रालयात येऊनही भेट दिली नाही, असे सांगत एका नागपूरकराने चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आपल्याला मंत्रालयात येऊनही भेट दिली नाही, असे सांगत एका नागपूरकराने चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर तीन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांनी दिले आहेत.बी. एस. बडवाईक या नागपूरकर व्यक्तीने याचिकेत म्हटले आहे की, ते २७ सप्टेंबर २०१७ रोजी मंत्रालयात आले होते. काही महत्त्वाच्या सार्वजनिक बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आपण अभ्यागतांसाठी भेटीच्या वेळेत मुख्य सचिवांच्या कार्यालयात गेलो होतो. तथापि, मुख्य सचिव आता भेटू शकणार नाहीत, असे म्हणून आपल्याला परत पाठविण्यात आले. मुख्य सचिवांना सामान्य नागरिक म्हणून भेटण्याचा आपला हक्क डावलण्यात आला, अशी कैफियत बडवाईक यांनी मांडली आहे. आपल्याला आधी सहा-सात वेळा असा अनुभव आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.मंत्रालयात विविध विभागांच्या सचिवांनी नागरिकांना एक तास भेटावे, असा नियम असून त्यासाठीची वेळही ठरवून देण्यात आली आहे. मात्र, अनेकदा अनेक सचिव त्या वेळेत कार्यालयातच नसतात किंवा असले तरी बैठकींमध्ये व्यग्र असतात. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी नागरिकांशी धड न बोलता बोळवण करतात, असा अनुभव बरेचदा येतो. आता भेट नाकारण्यात आलेल्या एका नागपूरकरास थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाºयांना त्यांचे शासकीय ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे अनिवार्य केले आहे.गळ्यात पास लावूनच फिरामंत्रालय आणि नवीन प्रशासन भवन येथील सुरक्षिततेच्या दृष्टीने अभ्यागतांना देण्यात येणाºया प्रवेश पासच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. अभ्यागतांना तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आलेला प्रवेशपास त्यांनी दोन्ही इमारतींमध्ये वावर असेपर्यंत दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. तसेच बाहेर जाताना त्यांनी प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांकडे पास परत करावा, असा आदेश गृह विभागाने काढला असून, शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालय