शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

पीटर मुखर्जीही आता संशयाच्या फेऱ्यात

By admin | Updated: September 3, 2015 01:44 IST

शीना मुखर्जी खून प्रकरणात पीटर मुखर्जीच्या मानेभोवती फास आवळत चालला आहे. शीनाची आई इंद्राणीच्या आयुष्यात काय चालले आहे हे मला माहिती नव्हते असा दावा आतापर्यंत पीटर मुखर्जी करीत होता

मुंबई : शीना मुखर्जी खून प्रकरणात पीटर मुखर्जीच्या मानेभोवती फास आवळत चालला आहे. शीनाची आई इंद्राणीच्या आयुष्यात काय चालले आहे हे मला माहिती नव्हते असा दावा आतापर्यंत पीटर मुखर्जी करीत होता. पण मुंबई पोलिसांतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पीटर मुखर्जीला अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण द्यावे लागेल किंवा अटकेत जावे लागेल. पीटरच्या ब्रिटन आणि स्पेनमधील बँक खात्यांची पोलिसांना चौकशी करायची आहे ती खुनाचा उद्देश काय होता आणि त्याचा संबंध हा पैशांशी होता का या अंगाने. यातून त्यांना काही पुरावे मिळतात का हे बघायचे आहे, अशी ‘लोकमत’ची माहिती आहे.आठ दिवसांत प्रथमच पोलिसांनी पीटर आणि इंद्राणीला समोरासमोर आणले होते. त्यानंतर शीना बोरा खून प्रकरणात पीटर मुखर्जीची काय भूमिका होती याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी पीटरच्या वरळीतील निवासस्थानी छापे घातले त्याच्या निवासस्थानाहून गुन्ह्याशी संबंध दाखविणारी कागदपत्रे जप्त केली आहेत व प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण मागत आहोत. आम्ही त्याला इंद्राणीच्या समोर आणले व त्याला बघताच तिला रडू कोसळले. आम्ही पीटरची कुटुंब, पैसा आणि गुन्ह्याच्या मुद्यांवर चौकशी केली, असे हा अधिकारी म्हणाला.आयएनएक्स मीडिया विकून आलेल्या पैशापैकी बहुतेक रक्कम पीटरने लंडन आणि स्पेनमध्ये ठेवली आहे. परराष्ट्रविषयक संबंधांच्या माध्यमातून आम्ही त्या बँकांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून खात्याचा तपशील मागवून घेऊ व आमच्याकडील पुराव्यांशी तो ताडून बघू, असेही अधिकाऱ्याने सांगितले. इंद्राणीने पीटरला शीना ही माझी मुलगी नसून बहीण असल्याचे सांगितले होते. जेव्हा शीना ही तिची मुलगी असल्याचे उघडकीस आले त्यावेळी मला धक्का बसला, असे मुखर्जीने पोलिसांना सांगितले आहे. इंद्राणी तिचा दुसरा पती संजीव खन्ना याच्या संपर्कात असल्याचे समोर आल्यावर मला धक्का बसल्याचेही पीटरने म्हटले होते. इंद्राणीवर संशय घ्यावा, असे कोणतेही कारण माझ्याकडे नव्हते आणि शीना अमेरिकेत आहे हे तिने मला पटवून दिले होते, असे पीटर मुखर्जी सांगत आला आहे. तेव्हा आधी आम्हाला इंद्राणीमुळे पीटर संकटात सापडल्याचे वाटले होते. परंतु इंद्राणीची चौकशी जसजशी पुढे सरकत होती तशा एकेक गोष्टी समोर येत गेल्या. त्यामुळे पीटरही त्या कटाचा भाग होता का याची आम्ही आता चौकशी करीत आहोत. पुरावा मिळताच त्याला अटक केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सिद्धार्थ दास यांची चौकशीकोलकाता : इंद्राणी मुखर्जी हिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ राहिलो असल्याचा दावा करणारे सिद्धार्थ दास यांची मुंबई पोलिसांनी बुधवारी कोलकात्यात चौकशी केली. डमडम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शीना बोरा ही आपली व इंद्राणीची मुलगी असल्याचा दावा मंगळवारी दास यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांचे तीन अधिकारी रात्री ८च्या सुमारास दास यांच्या डमडम भागातील दुर्गानगर येथील निवासस्थानी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. शीनाच्या हत्याप्रकरणात दासचा काही संबंध आहे वा नाही, यादृष्टीने मुंबई पोलीस शोध करत आहे, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. इंद्राणीच्या उपस्थितीत दास याची चौकशी होऊ शकते का, या प्रश्नाला उत्तर देताना अशी शक्यता आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. संजय खन्नाचा लॅपटॉप, कागदपत्रे जप्तमुंबई पोलिसांच्या एका पथकाने इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती आणि सहआरोपी संजीव खन्ना याच्या कोलकात्यातील घरातून बुधवारी एक लॅपटॉप तसेच बँक खाती व गुंतवणुकीशी संबंधित दस्तावेज जप्त केले. मुंबई पोलीस स्थानिक पोलिसांसोबत सकाळीच हॅस्टिंग्ज येथील त्याच्या घरी गेले होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव खन्नाचा लॅपटॉप जप्त करण्यासाठी मुंबई पोलिसांना सर्च वॉरंटची गरज होती. या कामात त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली.पीटर मुखर्जींची १२ तास चौकशीशीणा बोरा हत्येप्रकरणी खार पोलिसांनी बुधवारी तब्बल १२ तासांहून अधिक वेळ पीटर मुखर्जी यांची कसून चौकशी केली. खार पोलीस ठाण्यात इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती आहे. रात्री ११ वाजल्यानंतर पीटर मुखर्जी खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.