शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

'पीकविमा'त कीड, कृषिमंत्र्यांची घोटाळ्याची कबुली; योजनेत केली जाणार सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 08:07 IST

Crop Insurance: राज्य सरकारच्यावतीने २०२४च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

 मुंबई -  राज्य सरकारच्यावतीने २०२४च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. मात्र, ही योजना बंद न करता त्यात सुधारणा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्यावर्षी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड, परभणी जिल्ह्यांतील पीकविमा घोटाळा उघड केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात बोलताना मंत्री कोकाटे यांनी  ९६ महा-ई- सेवा केंद्रावर काही लोकांचे बोगस सातबारा उतारे काढल्याचेही मान्य केले आहे.

राज्यातील पाच ते सहा जिल्ह्यात  काही लोकांनी मशीद, मंदिर, एनए फ्लॉट किंवा शासकीय जमिनीवर विमा उतरवल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या सर्व महा-ई-सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हे  दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  तसेच जवळपास सव्वाचार लाख अर्ज रद्द केल्याने  येथे  कोणत्याही प्रकारचे  बोगस काम झालेले  नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निधी वाचला  असून शेतकऱ्यांच्या बँक  खात्यात  अद्याप पैसे वर्ग करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.

आमूलाग्र  बदल होतील- योजनेमध्ये आम्हाला काही बदल करायचे आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून ते शेतकऱ्यांकडून अभिप्राय घेतील. यानंतर योजनेत काही आमूलाग्र बदल होतील.  - ॲग्रिस्टॅक योजनेतून शेतकऱ्यांना  युनिक आयडी कार्ड देणार आहोत. त्यानंतर आधार कार्डशी आणि महसूल विभागाशी शेतकऱ्यांचे खाते जोडले जाईल.उपग्रहाद्वारे पीकविम्याच्या बाबतीत पारदर्शकता कशी येईल, यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे कृषीमंत्री कोकाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार