शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साडी नेसावी म्हणून छळ; तरूणाने घेतली पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 08:45 IST

‘जोगता’ बनविण्यासाठी आसुडाने मारहाण

लक्ष्मण मोरे पुणे : काही वर्षांपूर्वी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोघांनी साकारलेला ‘जोगवा’ सिनेमा आजही अंगावर शहारे आणतो. समाजातील देवभोळेपणावर प्रहार करणाऱ्या या सिनेमाच्या कथानकासारखी घटना कोंढव्यातील एका तरूणाच्या आयुष्यात घडली आहे. चक्क आई आणि भावांनीच १९ वर्षीय तरूणाला साडी नेसून जोगता हो, देव देव करून पैसे कमावून दे, यासाठी त्रास द्यायला सुरूवात केली. विरोध करताच आसुडाने मारहाण केली जात असल्याचे या तरूणाने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.हा तरूण कुटुंबियांच्या प्रचंड दहशतीखाली आहे. त्याचे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशचे आहेत. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून घरी आई, चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मोठ्या भावांची लग्ने झालेली असून त्यांना मुले आहेत. पीडित तरुणाच्या अंगात देवीचे वारे येते असे त्याच्या घरच्यांचे म्हणणे आहे. घरातील वातावरण अंधश्रद्धाळलेले असल्याने सर्वांनी त्याला देवीचा भगत म्हणून साडी नेसण्याचा आग्रह धरला आहे. मागील दोन वर्षांपासून त्याला सतत मारहाण केली जात आहे.हा तरूण कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये साफसफाईची आणि कचरा काढण्याची कामे करतो. दरमहा पगार हातात पडताच त्याला पुन्हा मारहाण सुरू केली जाते. आपण साडी नेसणार नाही आणि जोगता होणार नाही यावर तो ठाम आहे. मात्र, आई आणि दोन मोठे भाऊ त्याला यासाठी बळजबरी करतात. साडी नेस, घरात देव्हारा बनव, जोगता हो आणि लोकांचे बरे वाईट बघून पैसे कमावून दे, असा तगादा लावला आहे.सततची मारहाण आणि त्रास याला कंटाळून त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने घरच्यांकडून होणाºया त्रासाबाबत तो काम करीत असलेल्या सोसायटीतीतील नुरजहॉं शेख यांना सांगितले. शेख या दलित मुस्लिम ओबीसी विकास संघाच्या महासचिव आहेत. त्यांनी तरूणाला घेऊन कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र