शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

विक्रेत्यांमार्फत परमिटचे रॅकेट

By admin | Updated: May 30, 2016 03:45 IST

रिक्षा विक्रीच्या नावाखाली डिलरकडून परमिट विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- रिक्षा विक्रीच्या नावाखाली डिलरकडून परमिट विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईसह नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातील रिक्षाचालकांना परमिट मिळवून देण्याचे आमिष देवून त्यांची नोंदणी केली जात आहे. त्यानुसार परमिट मिळवण्यासाठी या डिलरकडे रिक्षा खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे.रिक्षा विक्रेते डिलर यांच्यासह काही रिक्षा युनियनमार्फत रिक्षा परमिट विक्रीचे रॅकेट चालवले जात आहे. परमिट मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्यांना त्यांच्याकडून लक्ष्य केले जात आहे. लायसन्स व बॅच आहे परंतु परमिट नाही, अशांना परमिट मिळवून देण्याची हमी दिली जात आहे. याकरिता त्यांच्याकडून ५० हजार ते १ लाख रुपये उकळले जात आहेत. दीड वर्षापूर्वी व जानेवारी महिन्यात आरटीओने काढलेल्या परमिटच्या सोडतीमध्ये प्रतीक्षा यादीत आलेल्यांचा विशेषत्वाने जाळ्यात ओढले जात आहे. परिवहन मंत्रालयात थेट सेटिंग असल्याचे सांगून दलाल परमिटसाठी ग्राहक शोधत आहेत. तर काही रिक्षा विक्रेत्यांनी रिक्षा खरेदी केल्यावर परमिट देखील मिळवून देतो, असे सांगायला सुरुवात केली आहे. सानपाडा गाव येथे सुरू असलेला असाच प्रकार उघडकीस आला आहे. त्याठिकाणच्या मातोश्री मोटर्स शोरूमच्या चालकाने १ रुपयात रिक्षा बुकिंगची जाहिरात केली आहे. यानुसार त्याच्याकडे चौकशीसाठी येणाऱ्यांना आपल्याकडूनच रिक्षा घेतल्यास परमिट देखील मिळवून देऊ, असे सांगितले जात आहे. या आमिषाला भुलून अवघ्या काही दिवसात दीड हजारहून अधिकांनी रिक्षा व परमिटसाठी कागदपत्रे जमा केली आहेत. दिवसेंदिवस पसरणाऱ्या या चर्चेनुसार दररोज अनेकांची झुंबड उडत असल्याचे दिसून आले आहे. त्याठिकाणी येणाऱ्यांमध्ये नवी मुंबईसह मुंबई व पनवेल परिसरातील रिक्षाचालकांचा समावेश आहे. या सर्वांना एकत्रित बसवून रिक्षासोबत परमिट कसे मिळवून दिले जाईल व त्यासाठी किती पैसे मोजायचे याची उघड माहिती दिली जाते. काहींनी या प्रकाराची तक्रार आरटीओकडे देखील केलेली आहे. यानंतरही संबंधितावर कारवाईऐवजी सुरू असलेल्या प्रकाराकडे डोळेझाक होत आहे.काही दिवसांपूर्वी वाशी रेल्वेस्थानक परिसरात बैठक घेवून एका रिक्षा चालक संघटनेनेच परमिटसाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज भरून घेतल्याचे समजते. यादरम्यान परमिटच्या नावाखाली संबंधितांनी ५० हजार ते १ लाख रुपये उकळल्याची चर्चा रिक्षा चालकांमध्ये आहे. यावरून आरटीओच्या मूक संमतीने परमिट विक्रीचे रॅकेट चालवले जात असून, त्यामध्ये दलालांसह रिक्षा संघटनाही सक्रिय असल्याचे उघड होत आहे.>परिवहन मंत्रालयापर्यंत धागेदोरे ?परमिट विक्री करणाऱ्या दलालांकडून त्यांची थेट परिवहन मंत्रालयापर्यंत पोच असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यात परमिटची सोडत निघणार असून त्याची प्रक्रिया आॅनलाइन असो किंवा आॅफलाइन, अर्ज भरणाऱ्यांचे नाव त्या यादीत असणारच याची हमी दिली जात आहे. मात्र यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दोन हजार रुपये लागणार असून, ते कधी द्यायचे हे फोनवर कळवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.