शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

शेतकऱ्यांना हवी कायमस्वरूपी टोलमुक्ती

By admin | Updated: July 16, 2017 01:04 IST

तुम्ही स्वेच्छेने तुमची जमीन देताय ना, शासनाचा तुमच्यावर कोणताही दबाव नाही ना आणि जमिनीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत ना? असे प्रश्न विचारून

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तुम्ही स्वेच्छेने तुमची जमीन देताय ना, शासनाचा तुमच्यावर कोणताही दबाव नाही ना आणि जमिनीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत ना? असे प्रश्न विचारून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरेदीखत स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची शनिवारी साक्ष काढली. मात्र, त्यातीलच एका शेतकऱ्याने आमच्या जमिनी या प्रकल्पासाठी आम्ही देत आहोत, तर आम्हा शेतकऱ्यांना जिवंत असेपर्यंत या महामार्गावर टोलमुक्ती मिळेल ना, असा प्रश्न थेट पालकमंत्र्यांना करताच सगळ्यांनी आपले कान त्यांच्या उत्तरासाठी टवकारले. तुमची मागणी योग्य असून तुमच्यासाठी टोलमुक्ती देण्याकरिता विचार करू, असे आश्वासन दिले.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या, त्यांना शिंदे यांच्या हस्ते खरेदीखत देण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. समृद्धी महामार्गाला शिवसेनापक्षप्रमुख विरोध करत असताना दुसरीकडे शिंदे खरेदीखत देत असलेल्या या विसंगतीवर माध्यमांनी बोट ठेवल्याने शुक्रवारपासून या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून वेळेत दोनतीन वेळा बदल करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी उद्धव ठाकरे व शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता शिंदे नियोजन भवनात पोहोचताच क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या हस्ते तीनही शेतकऱ्यांना खरेदीखत देण्यात आले. तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आणि तुम्ही जमिनी स्वत:हून देताय ना? असे प्रश्न शिंदे यांनी शेतकऱ्यांना विचारले. आमच्यावर कोणाचा दबाव नाही किंवा आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संंबंधित नाहीत. चांगल्या कामासाठी जमीन जातेय म्हणून आम्ही दिली. उलट, अपेक्षेपेक्षा शासनाने आम्हाला जास्त रक्कम दिली आहे, अशी भावना शेतकऱ्यांंच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात गणेश राऊत यांच्या मुखातून वदवून घेण्यात आली. काही शेतकऱ्यांनी पैसे जमा झाल्याचे बँकेकडून मोबाइलवर आलेले एसएमएसही शिंदे यांना दाखवले. आधी शहापुरात नियोजित असलेला कार्यक्रम तेथे आंदोलन होण्याच्या भीतीने ठाण्यात घेतला का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुंबईतील रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमाला सकाळी हजर राहायचे असल्याने शहापूर येथील कार्यक्रम रद्द केला, असे शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पाविरुद्ध जे आंदोलन करीत आहेत, त्यांची तेथे इंचभरही जमीन नाही. काही जण शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करू पाहत आहेत. हे प्रकार समोर आणले पाहिजे, या आरोपाचा शिंदे यांनी पुनरुच्चार केला. अशा आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची वेळ आली तर नक्कीच करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी दिले. या वेळी उपस्थित असलेले शहापूर तालुक्यातील अंदाड गावाचे अध्यक्ष शरद मोगरे यांनी आपल्या गावाने १०० टक्के संमतीपत्र दिले असून लवकरत नोंदणीप्रक्रिया चालू होणार असल्याचे सांगितले. आणखी ३२३ शेतकऱ्यांकडून संमतीपत्रशासनाने गणपत धामणे यांची ७० गुंठे जमीन खरेदी केली असून ७२ लाख ९१ हजार ७२४ रुपये, दौलत धानके यांना ८५ गुंठे जमिनीसाठी ७९ लाख७ हजार २७० रु पये तर गणेश राऊत यांच्या ४३ गुंठे जमिनीसाठी ३ लाख १६ हजार ३०८ रु पये इतका मोबदला त्यांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामागोमाग ठाण्यातील कसारा, वाशाळा, खर्डी, रातांधले, हिव, खुटघर, रास, अंदाड या गावांकडून १०० टक्के संमतीपत्रे आली असून येथील शेतकऱ्यांची संख्या ३२३ इतकी आहे. ५२ लाख ते ५ कोटी रु पये प्रतिहेक्टर दरशहापूर तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या २८ पैकी २३ गावांतील जमीनविक्र ीचे दर निश्चित करण्यात आले असून ही किंमत ५२ लाख ते ५ कोटी रु पये इतकी प्रतिहेक्टर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी दिली.