शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बालसुधारगृहाला हवा कायमस्वरूपी मानसोपचारतज्ज्ञ

By admin | Updated: November 14, 2014 00:35 IST

आजची लहान मुले उद्या देशाचे भवितव्य असतात. त्यामुळे चिमुरडय़ा वयात केलेल्या अपराधांची पुनरावृत्ती टाळून त्यांना सक्षम नागरिक बनविणो ही शासनाची गरज असते.

हिनाकौसर खान-पिंजार ल्ल पुणो
आजची लहान मुले उद्या देशाचे भवितव्य असतात. त्यामुळे चिमुरडय़ा वयात केलेल्या अपराधांची पुनरावृत्ती टाळून त्यांना सक्षम नागरिक बनविणो ही शासनाची गरज असते. मात्र, एखाद्या मुलाकडून अपराध घडला, तर तो का घडला, कोणत्या परिस्थिती घडला, ते करण्यामागे त्या चिमुरडय़ाची काय मानसिकता होती, त्याच्या मनावर कोणते आघात होते, हे जाणून घेण्याची गरजच आपल्या राज्य शासनाला वाटत नाही, अशी परिस्थिती बालसुधारगृहात दिसत आहे. गुन्हेगारीकडे खेचल्या गेलेल्या लहान मुलांचे विश्व समजून उभारी देण्यासाठी कायमस्वरूपी बाल मानसोपचारतज्ज्ञांची आवश्यकता असतानाही राज्यातील कोणत्याही बाल न्यायमंडळाकडे असे तज्ज्ञ नाहीत, हे उघड वास्तव आहे.
पुणो जिल्ह्यातील बाल न्याय मंडळाचे सदस्य वैयक्तिकरीत्या  मागील 4 वर्षापासून पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड असून, शासनाकडून केवळ चालढकल होत आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर 34 न्यायमंडळांची देखील आहे.
एखादा गुन्हा घडून गेल्यानंतर विधी संघर्षग्रस्त बालकांना, बाल न्यायमंडळासमोर दाखल केले जाते. तेथे न्यायपीठापुढे त्यांचा खटला चालतो. नियमित गुन्हेगारांप्रमाणो येथे या मुलांचा खटला चालविला जात नाही. त्यांना सुधारण्याची संधी मिळावी, असा हेतू येथे असतो. त्यामुळे त्यांची परिस्थिती समजून घेणो, त्यांना मार्गदर्शन करणो, गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी त्यांची मानसिकता समजून घेणो आवश्यक असते.  प्रोबेशन ऑफिसरच्या समुपदेशनाला योग्य तो प्रतिसाद लाभत नाही.
मुलांच्या जगाचा आढावा घेण्यासाठी, निरीक्षणो नोंदविण्यासाठी कायमस्वरूपी बालमानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता आहे. मुलांची मानसिकता लक्षात आली नाही, तर चुकांच्या पहिल्याच टप्प्यावर त्यांना परावृत्त करणो शक्य असते, हे शासनाला अद्यापही लक्षात येत नसल्याची खंत बाल न्यायमंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली. या संदर्भात पुणो जिल्ह्यातील बाल न्यायमंडळाने आयुक्त, जिल्हा न्यायाधीश, तसेच जिल्हाधिका:यांर्पयत हा विषय पोहोचवला, तरी काहीच हालचाल झाली नाही. सध्या बाल न्यायमंडळे एनजीओ किंवा सामाजिक भान जपणा:या वैयक्तिक समुपदेशकांची, तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. मात्र, पूर्णवेळ कार्य करणा:या मानसोपचारतज्ज्ञांची आवश्यकता आहे. समाजकल्याणचे आयुक्त, तसेच जिल्हाधिका:यांनी आदेश दिल्यास मानसोपचारतज्ज्ञांची सोय होऊ शकते; मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असे बाल न्यायमंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी सांगितले.