शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पर्ल्सचे गुंतवणूकदार आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: February 22, 2016 00:47 IST

पी.ए.सी.एल. (पर्ल्स) कंपनीच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, अशी मागणी करत अखिल भारतीय पी.ए.सी.एल. (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेने वांद्रे कुर्ला संकुल

मुंबई : पी.ए.सी.एल. (पर्ल्स) कंपनीच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, अशी मागणी करत अखिल भारतीय पी.ए.सी.एल. (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेने वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील सेबीच्या प्रधान कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीची व संचालकांची मालमत्ता याची तत्काळ विक्री करून सर्व तक्रारदार गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यासाठी सोमवारी, २२ फेब्रुवारीला सेबीच्या प्रधान कार्यालयावर बेमुदत धरणे देणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय निमंत्रक विश्वास उटगी यांनी सांगितले.उटगी म्हणाले की, राज्यातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये या प्रकरणात अडकलेले आहेत. २ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना न्यायमूर्ती लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यास सांगितले. ही समिती पर्ल्स कंपनीची सर्व मालमत्तेची पारदर्शक विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करेल. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कंपनीला वाचवण्यासाठी काही सेलीब्रिटी, खेळाडू आणि राजकीय व्यक्तींकडून हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप उटगी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)अनेक महिन्यांचा लढापर्ल्स कंपनीच्या चक्रनुवर्ती गुंतवणूक योजनांमध्ये बुडलेले पैसे ४५ दिवसांत परत करण्याचे आदेश सेबीने १२ आॅगस्ट २०१५ रोजी दिले होते.६० दिवसांनंतरही कंपनीने पैसे परत केले नाहीत, म्हणून ११ डिसेंबर, २०१५ रोजी सेबीच्या आदेशानुसार शासनाने कंपनी व संचालकांचे बँक खाते, डिमॅट खाते, सर्व मालमत्ता, जमिनी, प्लॉट, बंगले, कार्यालये आणि विदेशातील मालमत्ता ताब्यात घेतल्या. १५ डिसेंबर, २०१५ रोजी सेबी गुंतवणूकदार संघटनेने आझाद मैदानावर धरणे दिले.शासनाच्या कारवाईविरोधात कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला. २ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने कंपनीविरोधात निर्णय देत २ आॅगस्ट, २०१६पर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला.