शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

राज्यभरात लाच घेण्यात ‘भाजप’चे लोकसेवक पुढे

By admin | Updated: February 4, 2015 00:12 IST

मागच्या वर्षातील चित्र : राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनाही लाचखोरीत सामील

विश्वास पाटील - कोल्हापूर --पार्टी विथ डिफरन्स...’ अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाचे लोकसेवक लाच घेण्यात इतर पक्षांपेक्षा पुढे असल्याचे चित्र पुढे आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षात १९ पदाधिकाऱ्यांना (‘इतर लोकसेवक’ या व्याख्येत मोडणारे) लाच घेताना घेताना पकडले. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक पाचजण आहेत. राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेच्याही प्रत्येकी तिघांनी लाच घेतली आहे. राज्यभरातील १९ सरपंच व उपसरपंचही लाच घेण्यात पुढे आहेत.महिला आता जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत, तशा त्या लाच घेण्यातही पुरुषांच्या बरोबरीने आल्या आहेत. गेल्या वर्षात इतर १९ लोकसेवकांनी व १९ सरपंच-उपसरपंचांनी अशा एकूण ३८ लोकसेवकांनी लाच घेतली. त्यामध्ये १२ महिला आहेत. कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना ३० जानेवारीस अवघी दोनशे चौरस फूट जागा मूळ मालकास परत देण्यासाठी सोळा हजारांची लाच घेताना पकडले. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्याने शिवसेना व भाजपने महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे. भाजपने तर महापालिकेच्या इमारतीची प्रतिकृतीच रंकाळ्यात बुडविली आहे. या महापालिकेची आॅक्टोबरमध्ये निवडणूक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बदनामीची आयतीच संधी या दोन पक्षांना मिळाली; परंतु राज्यभरातील चित्र पाहता, या सध्याच्या सत्ताधारी पक्षांचे पायदेखील मातीचेच असल्याचे आकडेवारी सांगते. शासकीय अधिकाऱ्यांनाच लाच घेताना पकडता येते, असा एक समज सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे; परंतु नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौरांपासून ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अगदी सरपंचालाही लाच घेताना पकडता येते. जे लोक शासकीय सेवांचा लाभ घेतात व मानधनही स्वीकारतात, अशांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये ‘इतर लोकसेवक’ असे म्हटले जाते. त्यांनी प्रत्यक्ष, सरकारी स्वीय सहायक अथवा खासगी व्यक्तीमार्फत लाच घेतली तरी त्यांच्यांवर कारवाई होऊ शकते. कोल्हापूरच्या महापौरांवर याच तरतुदीन्वये कारवाई झाली आहे.महिला राजकीय सत्तेत आल्या म्हणजे सगळे मंगल होईल, अशा भ्रमात राहायचे कारण नाही; कारण त्या काही मंगळावरून आलेल्या नाहीत. त्यादेखील इथल्याच राजकीय व्यवहारातून पुढे आलेल्या आहेत. त्या महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी, विचारसरणी आणि आजूबाजूचे वातावरणही महत्त्वाचे आहे. आम्ही कम्युनिस्ट विचारसरणीतून पुढे आलो. आमच्यामध्ये राजकीय जाणीव तयार झाली आहे. त्यामुळे आम्ही कुठेही काम केले तरी एक छदामही कुणाकडून घेतला नाही. सत्ता कशासाठी हवी या प्रश्नाच्या मुळातही महिला लाच घेण्यात पुढे का, याचे उत्तर आहे. महिलांचे राजकीय भान वाढविणे हाच त्यावरील उपाय आहे. - डॉ. माया नारकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याभ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गेल्या चार वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे. २०१० ला राज्यात ४८६ प्रकरणे झाली होती. २०१४ ला ही संख्या १२४५ वर गेली. गेल्या वर्षात ३ अध्यक्ष, ४ सभापती, १० नगरसेवक आणि १९ सरपंच-उपसरपंचांना लाच घेताना रंगेहात पकडले. पूर्वी लोक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. आता लोकजागृतीमुळे ते धाडसाने पुढे येत आहेत. - लक्ष्मण जगदाळे, पोलीस निरीक्षक (सांख्यिकी विभाग), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईलाचखोर पदाधिकारीअशोक पवार, अध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा बालविकास समिती (काँग्रेस)धनराज गराटे, अध्यक्ष, ग्रामीण पाणीपुरवठा समिती हिंगणघाट (शिवसेना)वंदना चक्रे, सभापती, प्रभाग समिती, मीरा-भार्इंदर महापालिका (राष्ट्रवादी)अतुल गण्यापवार, सभापती, कृषी उत्पन्न समिती, चार्मोशी (राष्ट्रवादी)श्रीरंग खवरे, सभापती, पाणीपुरवठा विभाग, नगरपरिषद इचलकरंजी (काँग्रेस)उत्तम चंदू कोळंबे, सभापती, बांधकाम, जिल्हा परिषद, रायगड (शिवसेना)सुभाष चंपतराव माहुरे, अध्यक्ष, नागपूर दूध उत्पादक संघ, नागपूर (इतर)जयश्री ज्ञानेश्वर पाटील, नगरसेविका, उल्हासनगर (साई पक्ष)सिरिल डिसोझा, नगरसेवक, मुंबई महापालिका (अपक्ष)पृथ्वी वलेचा, नगरसेवक, उल्हासनगर (राष्ट्रवादी)महंत रामअनेसा चौबे, नगरसेवक, मुंबई महापालिका (भाजप)विद्याधर गोविंद भोईर, नगरसेवक, कल्याण-डोंबिवली (शिवसेना पुरस्कृत अपक्ष)माया हरीष चावला, नगरसेवक, उल्हासनगर (भाजप)हरीश जग्याशी, नगरसेवक, उल्हासनगर (भाजप)वर्षा गिरिधर भानुशाली, नगरसेविका, मीरा-भार्इंदर महापालिका (भाजप)श्रद्धा राजेश पाटील, नगरसेविका, मुंबई महापालिका (मनसे)ज्ञानमूर्ती शर्मा, नगरसेवक, मुंबई महापालिका (भाजप)नवनाथ भानुदास पवार, नगराध्यक्ष, सांगोला (शेकाप)चंदन(सुहास) हुनराव, नगराध्यक्ष, सांगोला (काँग्रेस)पक्षनिहाय लाचखोर -५, भाजप-३, राष्ट्रवादी-३, काँग्रेस-३, शिवसेना १-, शेकाप-१, मनसे-२ इतर-१,