शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित ३०७ कोटींच्या रकमेची सरकारकडून पूर्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:49 IST

गडचिरोलीतील नक्षली स्फोटप्रकरण; शहीद जवानांच्या वारसांना प्रत्येकी ५५ लाखांचे होणार वाटप

- जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नक्षलवाद्यांनी महाराष्टÑ दिनी केलेल्या स्फोटात शहीद झालेल्या १५ जवानांच्या कुटुंबीयांना निधीची पूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी रखडलेली एकूण ३०७.५ कोटी रकमेची शासनाने विशेष बाब म्हणून आकस्मिक निधीतून पूर्तता केली आहे. शहिदांच्या वारसांना येत्या २७ मे रोजी प्रत्येकी ५५ लाखांचे वाटप केले जाईल.गडचिरोलीतील जांभूळखेडा येथे झालेल्या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या जवानांसाठीच्या राखीव सुरक्षा संबंधित खर्च (एसआरई) निधीबाबतच्या कागदपत्रांची पोलीस मुख्यालयातून पूर्तता न झाल्याने रक्कम मिळण्यास विलंब झाला होता. त्याबाबत शहीद जवानांच्या पत्नी व कुटुंबीयांनी वरिष्ठ अधिकारी, सरकारबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने सोमवारी पोलीस कल्याण निधीच्या विम्याची रक्कम वगळता अन्य निधीची पूर्तता गडचिरोली अधीक्षक कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.नक्षलग्रस्त हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना राज्य सरकारकडून विविध पाच प्रकारे आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. त्यापैकी शहीद १५ जवानांच्या कुटुंबीयांना २ मे रोजी प्रत्येकीएक लाख रुपयांचा निधीपोलीस कल्याण निधीतून देण्यात आला आहे.याशिवाय राज्य सरकारकडून प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना २५ लाख तसेच सदनिकेऐवजी २२.५ लाख रुपये, सुरक्षा संबंधी खर्च (एसआरई) निधीतून २०.५ लाख आणि राज्य सरकार व पोलीस कल्याण मंडळाकडून विम्याच्या रूपात प्रत्येकी १० लाखांचा निधी देण्याची तरतूद आहे. यापैकी ‘एसआरई’च्या रकमेबाबत पोलीस मुख्यालयातून कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने निधी मंजूर होण्यात अडचण निर्माण झाली होती. मात्र आता ती दूर झाल्याने शहीद जवानांच्या वारसांना २७ मे रोजी प्रत्येकी ५५ लाखांचे वाटप करण्यात येईल.दरम्यान, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी रक्कम त्यांनी नमूद केलेले वारसांचे पॅन कार्ड, बॅँक अकाउंट याची पडताळणी करून त्यावर वर्ग केली जाईल. विवाहित जवानांना मिळणाºया रकमेपैकी ५ लाखांची रक्कम त्यांच्या पालकांना तर उर्वरित पत्नी व वारसांना दिली जाईल. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांपैकी योगेश सीताराम हालमी वगळता अन्य १४ जवान विवाहित होते.चौकशीअंती कार्यवाहीशहीद जवानांच्या कुटुंबीयांना शासनाकडून देय असलेली रक्कम शक्य तितक्या लवकर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये कसलाही अडथळा येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ‘एसआरई’ची कागदपत्रे अपुरी राहिल्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात येत आहे.- सुबोध कुमार जायस्वाल, पोलीस महासंचालकवारसाला सरकारी नोकरीशहीद जवानांना त्यांच्या निवृत्तीच्या वयापर्यंत नियमानुसार वेतन, पदोन्नती दिली जाईल. त्याचबरोबर त्यांच्या एका वारसाला सरकारी नोकरीत सामाविष्ट करून घेण्यात येईल. त्याबाबतची कार्यवाही त्वरित सुरू केली जाईल.- राजेंद्र सिंह, अप्पर महासंचालक,नक्षलविरोधी विशेष अभियान