शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलांची रक्कम भरून गावच झाले थकबाकीमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 01:43 IST

घडला इतिहास, नागपूरमध्ये घरगुती, वाणिज्य, औद्योगिक बिले भरली

मुंबई :  वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरू झाली असून, नागपूर येथील एका गावाने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीचे चालू व थकीत वीजबिलांची संपूर्ण रक्कम भरून अख्खे गावच थकबाकीमुक्त करण्याचा इतिहास घडविला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ६ गावांतील सर्व १३५ शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या थकबाकीचा भरणा करून संपूर्ण गावाला १०० टक्के थकबाकीमुक्त केले आहे.वीजबिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळवित आज पर्यंत ११ लाख ९६ हजार १८४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून १ हजार १६०  कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. योजनेतील सहभागासोबतच ग्रामपंचायत, जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी ७७३ कोटींचा हक्काचा ६६ टक्के निधी शेतकऱी मिळविणार आहेत. २ लाख ८७ हजार ६४ शेतकऱ्यांनी चालू वीजबिलांसह सुधारित मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून कृषिपंपाच्या वीजबिलांतून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे.  मागील वर्षी १ एप्रिल २०२० पासून जमा होणाऱ्या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. यात आतापर्यंत एकूण ११६० कोटी ३४ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी ६६ टक्के रक्कम म्हणजे ७७३ कोटी रुपयांचा निधी कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी आहे.कुठे जमा झाला किती निधीपुणे प्रादेशिक विभागात ४४१ कोटी ८ लाखकोकण प्रादेशिक विभागामध्ये २२३ कोटी ९१ लाखऔरंगाबाद प्रादेशिक विभागामध्ये ९६ कोटी १६ लाखनागपूर प्रादेशिक विभागामध्ये ६७ कोटी ३८ लाखवीजबिलांच्या थकबाकी मुक्तीसाठी ओढ१२ लाख शेतकऱ्यांनी केला ११६० कोटींचा भरणाकृषी वीजयंत्रणेसाठी मिळविणार हक्काचा ७७३ कोटींचा निधी 

टॅग्स :electricityवीज