शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांना लागू करणार प्राध्यापकांची वेतनश्रेणी; यूजीसीकडे पाठपुरावा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 06:14 IST

कोल्हापूर येथे ३ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत प्राचार्यांच्या संघटनेतर्फे ही बाब उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यावर सकारात्मक विचार सुरू होता. 

मुंबई - प्राध्यापकांपेक्षाही कमी वेतनावर काम करावे लागणाऱ्या प्राचार्यांना दिलासा मिळणार आहे. प्राचार्यांची वेतनश्रेणी प्राध्यापकांच्या समकक्ष करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असून त्याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पाठपुरावा केला जाणार आहे.

राज्यातील शेकडो प्राचार्यांना याचा लाभ होईल. तर मुंबईतील २०६ महाविद्यालयांतील प्राचार्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. मुंबईत एकूण ८७५ महाविद्यालये असून त्यापैकी २०६ अनुदानित आहेत. या अनुदानित महाविद्यालयांतील जवळपास सर्वच प्राचार्य असोसिएट प्रोफेसर आहेत. प्राध्यापकाचा दर्जा नसल्याने त्यांचे वेतन प्राचार्य असूनही महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून मान्यता असल्यापेक्षा कमी आहे. ही तफावत भरून काढण्याची मागणी राज्याच्या प्राचार्यांच्या संघटनेने केली होती. कोल्हापूर येथे ३ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत प्राचार्यांच्या संघटनेतर्फे ही बाब उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यावर सकारात्मक विचार सुरू होता. 

यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार मुंबई दौऱ्यावर असताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. या बैठकीत हाही प्रश्न मांडण्यात आला. त्यात राज्य सरकारच्या प्रस्तावाची दखल घेऊ,  असे आश्वासन यूजीसीच्या अध्यक्षांनी दिले. राज्य सरकारकडून यूजीसीकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. प्राध्यापकांचे वेतन तीन लाखांच्या आसपास आहे. तर असोसिएट प्राध्यापकांचे वेतन अडीच. ही तफावत एकसमान वेतनश्रेणीमुळे भरून निघेल, अशी अपेक्षा मुंबईतील प्राचार्यांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. टी. ए.  शिवारे यांनी व्यक्त केली. 

तफावत का?महाविद्यालये अनेकदा आपल्या मर्जीतील अध्यापकांची प्राचार्य म्हणून नेमणूक करतात. प्राचार्यपदाकरिता खरे तर प्राध्यापक म्हणून मान्यता असणे आवश्यक आहे. मात्र, ती नसल्याने कॉलेजातील इतर प्राध्यापकांपेक्षा कमी वेतन असतानाही त्यांना वरिष्ठ पदावरील जबाबदारी हाताळावी लागते.