शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधारला मिळणार का गती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:27 IST

पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणीनदी सुधारविषयी राजकीय मानसिकता नसल्याने नदीसुधार विषय आजवर कागदावरच राहिला आहे.

विश्वास मोरे पिंपरी, दि. 7 - पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणीनदी सुधारविषयी राजकीय मानसिकता नसल्याने नदीसुधार विषय आजवर कागदावरच राहिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नितीन गडकरी यांना नदी सुधार आणि गंगा नदीसुधार हेही खात्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या जवळच्या पवना, मुळा आणि इंद्रायणीनदीस गती मिळेल, अशी आशा महापालिकेतील भाजपाच्या सत्ताधा-यांना आहे. त्यामळे नदीसुधारला गती मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतून तीन नद्या वाहतात. इंद्रायणी आणि मुळा या नद्या शहराच्या सीमेवरून आणि पवना ही नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. शहराची लोकसंख्या ही बावीस लाखांवर पोहोचली आहे. मुळा आणि इंद्रायणी नदीच्या तुलनेत पवना नदीचे प्रदूषण अधिक आहे, असा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अहवाल सांगतो. याचे प्रमुख कारण म्हणजे, शहरातील औद्योगिक परिसरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते. शहरामध्ये छोटे-मोठे सुमारे साडेसहा हजार उद्योग आहेत. तसेच हजारो लघुउद्योग सुरू आहेत. जलनिस्सारण अर्थात एसटीपी प्लांट उभारूनही केवळ ८० टक्केंच पाणी प्रक्रिया केले जाते. उर्वरित पाणी तसेच नदीत सोडले जाते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नदी प्रदूषणाचे प्रमाण वाढतच आहे. नदीप्रदूषणाबाबत महापालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे नदी प्रदूषण करण्यांवर अजूनही कडक कारवाई झालेली नाही.

आघाडी सरकारला अपयश

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालखंडात पवना नदीसुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पदाधिका-यांनी गुजरात येथील प्रकल्पांची पाहणी करून संबंधित आराखडा तयार करून राज्य सरकारला सादर केला होता. पर्यावरण विषयक जाण नसलेले नेते  असल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले गेले. केवळ निधी नसल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. सत्तांतर झाल्यानंतरही आजपर्यंत नदी सुधारकडे दुर्लक्ष झाले आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, त्यावर ठोस असा निर्णय झाला नाही. तसेच तीन महिन्यांपूर्वी आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचे खापर पिंपरी-चिंचवडकरांवर आणि सत्ताधा-यांवर फोडले होते. त्यानंतर भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार यांनी याबाबत अधिवेशनात आवाजही उठविला होता. 

आता गती मिळणार

अत्यंत कार्यक्षम आणि बोले तैसा चाले अशी नितीन गडकरी यांची ख्याती आहे. त्यामुळे नदी सुधारबाबतचे खाते गडकरी यांच्यावर सोपविले आहे. त्यामुळे नदीसुधारप्रकल्पाला चालना मिळणार अशी खात्री शहरातील नितीन गडकरी यांच्या गटाला आहे. त्यामुळे गडकरी यांच्या दौ-याची उत्सुकता सत्ताधा-यासह पर्यावरण प्रेमी नागरिकांनाही आहे. याबाबत महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी नदी सुधारला प्राधान्य दिले नाही. केवळ ठराव, प्रस्ताव करून फायदा काय? पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्याचा विचार नदीसुधारमध्ये करावा, अशी आमची मागणी आहे. गडकरी यांनी नुकताच नद्यासंदर्भातील खात्याचा पदभार स्विकारला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमधील सीआयआरटीमधील एका कार्यक्रमास ते येणार आहेत. त्यामुळे नदीसुधारविषयी आग्रह करणार आहे. नदी सुधारसाठी केंद्राने निधी द्यावा, अशी मागणी करणार आहे. त्यामुळे आता या कामास गती मिळेल, अशी आशा आहे.’’