शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

पातूरच्या कांद्याचे राज्यभरात नाव!

By admin | Updated: June 24, 2015 01:33 IST

आयसीएआरने दिला द्वितीय क्रमांक.

अकोला : अकोला जिल्हय़ातील पातूर तालुक्यातील देऊळगावचे शेतकरी नामदेवराव अढाऊ यांनी एका एकरात २१ टन कांद्याचे विक्रमी उत्पादन घेऊन कांदा उत्पादनाकडे शेतकर्‍यांचे लक्ष केंद्रित केले आहे. या पांढर्‍या शुभ्र कांद्याचे उत्पादन वाढतच असून,भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कांदा स्पर्धेत या कांद्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राजगुरू नगर, पुणे येथील राष्ट्रीय कांदा व लसूून संचालनालयाच्यावतीने १६ जून रोजी राज्यस्तरीय कांदा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत पातूरच्या कांद्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक मराठवाड्यातील बीड जिल्हय़ाचे शेतकरी बाबासाहेब पिसोरे त्यांच्या शेतातील कांद्याला मिळाला आहे.गतवर्षी या कांद्यापासून अढावू यांना २.५0 लाख रुपये निव्वळ नफा झाला होता. त्यांच्या यशानंतर या तालुक्यातील शेतकर्‍यांनी ७५0 एकरावर कांद्याची लागवड केली. शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून आता शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले आहेत. याची भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) दखल घेतली आणि अढावू यांची यशोगाथा त्यांच्या संकेतस्थळावर, मुख्यपृष्ठावर प्रकाशित केलेली आहे. अढाऊ हे पारंपरिक पद्धतीने १.२५ एकरावर कांद्याची लागवड करीत होते. अपेक्षेनुसार त्यांना उत्पन्न होत नसल्यामुळे त्यांनी कांदा व अद्रक संशोधन केंद्र, हैदराबाद यांनी संशोधन केलेले वाण ह्यभीमा शुभ्रह्ण या पांढर्‍या कांद्याची लागवड केली. या वाणाची खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. अढाऊ यांना एक एकर क्षेत्रातून २१ टन कांद्याचे उत्पादन मिळाले होते. या कांद्याचा आकार एकसारखा आहे, हे विशेष. त्यांना २.५0 लाखांचा निव्वळ नफा झाला. या वाणाची महती त्यांनी ३00 शेतकर्‍यांना समजावून सांगितली. त्यामुळे ७५0 एकरावर या कांद्याची पेरणी शेतकर्‍यांनी केली असून, चांगले उत्पादन घेतले आहे. अढाऊ यांच्या कांदा बीजोत्पादनाची या राज्यासह देशात मागणी वाढली आहे.*राष्ट्रपतींनी केली प्रशंसा अढाऊ यांनी हा कांदा नागपूर येथील वसंत कृषी प्रदर्शनात ठेवला होता. त्यांच्या स्टॉलला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भेट दिली असता, या कांद्याची गुणवत्ता बघून राष्ट्रपतींनी प्रशंसा केली होती. या वाणास त्यांनी कांद्याचा राजा असे संबोधित केले होते.