शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना निकृष्ट औषधे!, दुकानांची तपासणी न करताच दिले परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:51 IST

राज्यात निकृष्ट दर्जाची औषधे विकली गेली असून, या औषधांचे सेवन केलेल्या नागरिकांना भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते

मुंबई : राज्यात निकृष्ट दर्जाची औषधे विकली गेली असून, या औषधांचे सेवन केलेल्या नागरिकांना भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) अहवालात व्यक्त करण्यात आली असून, अन्न व औषधी प्रशासनावर कडक ताशेरे ओढले आहेत.‘कॅग’चा हा अहवाल बुधवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. बाजारात औषधांचा साठा येण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते. मात्र, सरकारच्या अखत्यारित असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून ही गुणवत्ता तपासली गेली नाही. या विभागाने १,५३५ औषध विक्रेत्यांच्या परवान्यांची तपासणीच केली नाही, तर १,२८६ औषध विक्रेत्यांना तपासणीविनाच परवान्यांचे वाटप करण्यात आले.राज्यातील औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून सिरप,गोळ्या, इंजेक्शनसारख्या महत्त्वाच्या ९२ औषधांच्या तपासणीत ती कमी मानांकनाची असल्याचे आढळून येऊनही, त्या औषधांचा पुरवठा बाजारात होऊन त्याची विक्री झाली. अन्न व औषध प्रशासन विभागात असलेले अपुरे मनुष्यबळ, अपुºया प्रयोगशाळा आणि यंत्र सामग्री व कामकाज पद्धतीवर कॅगने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.कमी मानांकनाची औषधांची विक्री केल्याबद्दल या विभागाने संबंधित कंपन्यांवर कोणतीच कारवाई केली नाही वा उत्पादने बाजारातून मागे घेतली नाहीत.गुटखा, पानमसाला सारख्या उत्पादनांवर राज्यात बंदी असताना, त्याची विक्री करताना तो माल जप्त केला खरा. मात्र, त्याची तपासणी केली नाही. अनेक सौदर्य प्रसाधनांच्या मानांकनाची तपासणीही करण्यात आलेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. परवान्यांचा घोळ असलेल्या औषध विक्रेत्यांकडून चुकीच्या औषधांचा पुरवठा होऊन, जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता कॅगने वर्तविली.

टॅग्स :medicinesऔषधं