शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी मार्गस्थ

By admin | Updated: June 29, 2016 01:26 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या अभंगांनुसार पालखी प्रस्थानापूर्वी देहूनगरीत वृक्षारोपण करण्यात आले.

पिंपरी : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या अभंगांनुसार पालखी प्रस्थानापूर्वी देहूनगरीत वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ सुंदर अर्थात निर्मल वारीचा संकल्प झाला. टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी पाचला उद्योगनगरीत प्रवेशिला. वरुणाचा अभिषेक आणि उद्योगनगरीने वैष्णवांच्या मेळ््याचे मनोभावे स्वागत केले.ऊन-सावलीचा खेळ, अधून-मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अशा आल्हाददायक वातावरणात विठुनामाचा गजर करीत पालखी सोहळा वारीची वाट चालू लागला आहे. इनामदारवाड्यातील आजोळघरी मुक्काम करून मंगळवारी सकाळी अकराला सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी सकाळी साडेआठला आजोळघरी इनामदारवाड्यात जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या हस्ते महापूजा झाली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे, सोहळाप्रमुख सुनील मोरे, अशोक नि. मोरे, अशोक मोरे, बीडीओ संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, हवेलीचे तहसीलदार किरणकुमार काकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, देहूगावच्या सरपंच हेमा मोरे आदी उपस्थित होत्या. महापूजेनंतर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या अभंगानुसार वैष्णवांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडला. गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणपूरक, स्वच्छ, सुंदर निर्मल वारीचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर देहूकरांचा निरोप घेऊन वैष्णव वारीची वाट चालू लागले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधून-मधून हलक्याशा पावसाच्या सरी बसरत होत्या. त्यामुळे वैष्णवांच्या भक्तीचा रंग अधिकच गहिरा होत होता. प्रवेशद्वारावर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. अनगडशाहवलीबाबा दर्गा येथे दुपारचा विसावा झाला. पहिल्या अभंगआरतीनंतर पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने निघाला. दुपारी अडीचच्यादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस असतानाही वारकऱ्यांच्या उत्साहात तसूरभरही कमतरता जाणवली नाही. चिंचोली, देहूरोडमध्ये लष्करी जवानांच्या वतीने ब्रिगेडियर देवेन पटेल यांनी दिंडीप्रमुखांचे स्वागत केले. तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि सीओडी आणि डीओडीच्या कामगारांनी वारकऱ्यांची सेवा केला. त्यानंतर पालखी सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ झाला. दुसरीकडे पालखी सोहळा अनुभवण्यासाठी निगडी भक्ती-शक्ती चौक येथे मोठ्या प्रमाणावर भाविक जमलेले होते. उद्योगनगरीतून महापालिका, प्राधिकरण आणि विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी कक्ष उभारलेले होते. ध्वनिक्षेपकावर विठ्ठलभक्तीचा महिमा सांगणारी गीते सुरू होती. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास नगारा आणि चौघडा उद्योगनगरीत प्रवेशिला. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास रथ आला. तिथे शहराच्या वतीने महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती डब्बू आसवानी यांनी सोहळ्याचे स्वागत केले. महापालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. या वेळी विविध शाळांची दिंडी पथके सहभागी झाली होती. तसेच पोलीसमित्र संघटनेचे कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसादवाटप, पाणीवाटप, चहापाणी, चप्पलदुरुस्ती, आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येत होत्या. त्यानंतर सोहळा निगडी टिळक चौकमार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचला. अभंगारतीनंतर सोहळा विसावला. बुधवारी पहाटे साडेसहाला सोहळा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पिंपरी एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिरात पहिला विसावा त्यानंतर दापोडीत दुपारचा विसावा होणार असून, बोपोडी, खडकी, वाकडेवाडीमार्गे सोहळा पुण्यात मुक्कामासाठी थांबणार आहे. टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत सायंकाळी पाचला प्रवेशिला.