शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

आॅनलाइन स्थळांसाठी पासपोर्ट, आधार सक्तीचे!

By admin | Updated: January 14, 2016 04:12 IST

आपल्या आयुष्याचा जोडीदार वधू-वर सूचक मंडळाच्या संकेतस्थळांवर (मॅट्रिमोनियल वेबसाइट्स) शोधणाऱ्यांना आपले नाव तेथे नोंदविण्यासाठी आता आपला पासपोर्ट क्रमांक

- डिप्पी वांकाणी,  मुंबईआपल्या आयुष्याचा जोडीदार वधू-वर सूचक मंडळाच्या संकेतस्थळांवर (मॅट्रिमोनियल वेबसाइट्स) शोधणाऱ्यांना आपले नाव तेथे नोंदविण्यासाठी आता आपला पासपोर्ट क्रमांक आणि आधार कार्डचा तपशील द्यावा लागेल. नायजेरियन लबाडांनी बनावट प्रोफाइल्स तयार करून इच्छुक परंतु भोळसट उमेदवारांची फसवणूक करण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या आठवड्यात मॅट्रिमोनियल पोर्टल्सना वरील तपशील देणे बंधनकारक करण्यास सांगणार आहे. हा आवश्यक तपशील पोर्टल्स स्वीकारणार नाही, त्यावेळी जी माहिती अपलोड केली आहे तिची शहानिशा सरकारी यंत्रणा करील व त्यानंतर युजरला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) दिला जाईल. आम्ही केवळ माध्यम आहोत आणि विवाह करू इच्छिणाऱ्या दोन प्रौढांना भेटण्याचे केवळ ठिकाण म्हणून काम करतो, असे सांगून पोर्टल्स आपली जबाबदारी झटकत आले आहेत.इंडियन मॅट्रिमोनियल पोर्टल्सवर अनिवासी भारतीय (एनआरआय) किंवा पीआयओला (पर्सन आॅफ इंडियन ओरिजिन) प्रोफाइल तयार करायचे असल्यास त्यांना कोणती माहिती द्यावी लागेल, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की, प्रत्येक देशाचा त्याच्या नागरिकासाठी युनिक आयडी असतो. अशी कोणती माहिती ते देऊ शकतील, की जिची आम्ही शहानिशा करू शकू. त्यासाठी आम्ही सायबर आणि तांत्रिक तज्ज्ञांशी चर्चा करीत असून लवकरच ती संपेल.भावनांचा घेतात गैरफायदाअधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नायजेरियन लबाडांनी इच्छुक वधू आणि वरांची फसवणूक केली आहे. या लबाडांची काम करण्याची पद्धत अशी आहे, की ते श्रीमंत व्यावसायिक किंवा अनिवासी भारतीय आहे असे बनावट छायाचित्र वापरून प्रोफाइल तयार करतात. त्यानंतर पुन्हा लग्न करू इच्छिणाऱ्या विधवा किंवा विधुरांशी चॅटिंग सुरू करतात. ते त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेत त्यांना आपल्या जाळ््यात ओढण्यासाठी खोटी आश्वासने देतात.मध्यरात्री ते आपल्या सावजाला (विधुर किंवा विधवा) फोन करतात व तुला भेट देण्यासाठी घेऊन आलेल्या महागड्या दागिन्यांसह कस्टम्सने मला पकडले आहे, असे सांगतात. कस्टम्समध्ये पैसे भरण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास ते इच्छुकाला सांगतात व नंतर त्यांच्याशी संपर्कच होत नाही, असे हा अधिकारी म्हणाला. आपली जबाबदारी झटकणाऱ्या पोर्टल्सना आम्ही पत्र लिहिणार आहोत. तुमची जबाबदारी अधिक असून, जे लोक प्रोफाइल तयार करू इच्छितात त्यांना साइनअप करण्यासाठी आणखी काही गोष्टींची भर त्यात घातली पाहिजे, असे आम्ही त्यांना सांगणार आहोत, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.या संकेतस्थळांवर जे आपली माहिती देऊ इच्छितात (साइनअप) त्यांची विश्वासार्हता काय, हे आता आम्हाला तपासून बघायचे आहे. पोर्टल हा तपशील बघू शकणार नाही. परंतु हा तपशील थेट सरकारी यंत्रणेकडे जाईल व ही यंत्रणा संपूर्ण स्वयंचलित पद्धतीने अतिशय झटपट या माहितीची शहानिशा करून उपलब्ध माहिती त्यांनी दिलेल्या माहितीशी जुळणारी असेल तर वन टाइम पासवर्ड तयार करील. त्यानंतरच इंडियन मॅट्रिमोनियल पोर्टल्स तयार करता येईल, असे हा अधिकारी म्हणाला.