शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रवाशांची टॅक्सीचालकाकडून लूट

By admin | Updated: April 20, 2015 02:53 IST

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई फिरण्यासाठी आलेल्या यूपीतील एका कुटुंबाला टॅक्सीचालकासह त्याच्या साथीदाराने लुटल्याची घटना शनिवारी

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई फिरण्यासाठी आलेल्या यूपीतील एका कुटुंबाला टॅक्सीचालकासह त्याच्या साथीदाराने लुटल्याची घटना शनिवारी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे घडली. याबाबत कुर्ला रेल्वे पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करीत यातील टॅक्सीचालकास अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणारा सय्यद हसन (४२) हा तरुण नासीर सय्यद (१३) आणि असद सय्यद (१४) या दोन पुतण्यांना घेऊन शनिवारी सकाळी ७च्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आला होता. धारावी परिसरात त्यांना जायचे असल्याने त्यांनी येथील एका टॅक्सी स्टॅण्डवरून साडे-तीनशे रुपयांत एक टॅक्सी ठरवली. मात्र या वेळी या टॅक्सीचालकाचा आणखी एक साथीदार टॅक्सीत येऊन बसला.आरोपींनी ही टॅक्सी ईस्टर्न एक्स्प्रेस हाय-वेवरून नेली. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी थांबवून आरोपींनी या तिघांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेत त्यांना रस्त्यामध्येच सोडले. त्यानंतर या तिघांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत तिघांना घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस गाठले. याच ठिकाणी आरोपी टॅक्सीचालक उभा असल्याचे सय्यद हसन यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बाबू कांबळे (२८) या टॅक्सीचालकाला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)