शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

प्रवाशांचा जीव टांगणीलाच !

By admin | Updated: February 27, 2015 02:13 IST

मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलमधून पडून रोज सुमारे १०-१२ जणांना अपघात होतो. त्यात अनेकांचा मृत्यू होतो तर काहींना कायमस्वरूपी

मुंबई : मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलमधून पडून रोज सुमारे १०-१२ जणांना अपघात होतो. त्यात अनेकांचा मृत्यू होतो तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. रेल्वेची चूक असल्याचे सिद्ध झाल्यावरही वारसांना भरपाईसाठी झगडावे लागते. पण यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने यावर कोणताही उपाय सुचवलेला नाही. या मुद्द्यावर उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे कायदे सल्लागार आणि पश्चिम रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी अ‍ॅड. दत्तात्रय गोडबोले यांनी ‘लोकमत’शी केलेली बातचीत. जर एखादा प्रवासी गाडीच्या फूट बोर्डवरून पडला किंवा गाडीत चढताना/उतरताना पडला, मरण पावला किंवा गंभीर जखमी झाला तर त्याच्या वारसास भरपाई मागण्याचा अधिकार रेल्वे अधिनियमाच्या कलम १२३(२) व १२४ने दिला आहे. रेल्वे प्रशासनाने एका बिलाद्वारे हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ते लोकसभेपुढे आले तेव्हा सर्व खासदारांनी त्याला विरोध केला. त्यामुळे ते संसदेच्या रेल्वेसाठीच्या स्थायी समतीला पाठवून देण्यात आले. या समितीने मुंबईत येऊन काही मान्यवरांच्या भेटीही घेतल्या. प्रवासी संघटनांच्या केवळ काही मोजक्याच प्रतिनिधींना त्यासाठी बोलाविले होते. त्यांनी या बिलास ठाम विरोध केला आहे.पोर्ट ट्रस्टची जागा मिळवावीरेल्वे कुर्ला व मुंबईच्या मध्ये पाचवा व सहावा मार्ग बांधणार आहे. त्यासाठी फार मोठी व्यापारी तसेच रहिवासी जागा मिळवणार आहे. त्यासाठी रेल्वेस फार मोठी नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. त्याऐवजी जर मुंबई पोर्ट ट्रस्टची त्या भागातील जागा मिळविली तर ती स्वस्तात मिळू शकेल. लांब पल्ल्याच्या गाड्या तेथून नेता येतील. वेळही फार कमी लागेल. परंतु सरकार त्यासाठी तयार दिसत नाही. आम्ही पाठवलेल्या पत्राला केराच्या टोपली दाखवल्याचे दिसते.कर्जत-पनवेल दुहेरीकरणाकडे दुर्लक्षसध्या कर्जत-पनवेल हा सुमारे १८ ते २० किलोमीटरचा रेल्वे मार्ग एकेरीच आहे. त्यामुळे रेल्वे त्या मार्गावर उपनगरीय गाड्या चालवित नाहीत. दुसरे कारण असे सांगितले जाते की त्या मार्गावर बऱ्याच मालगाड्या चालतात. परंतु गेल्या १० वर्षांत तो मार्ग दुहेरी करण्याचे काम रेल्वेने अग्रक्रमाने केलेले नाही. इतर ठिकाणीही नवीन रेल्वे मार्गांची कामे अर्धवट आहेत. तिथेसुद्धा गाड्या सुरू केलेल्या नाहीत. २० किमीचे काम सात-आठ महिन्यांत पूर्ण करता येईल. जर तसे करून कर्जत-पनवेल मार्ग दुहेरी केला तर तिथे दुप्पट गाड्या चालवता येतील. आता त्यास मंजुरी दिली आहे, परंतु त्याची पूर्तता लवकर होणे महत्त्वाचे आहे.> अ‍ॅड. दत्तात्रय गोडबोलेउपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे कायदे सल्लागार फलाटांना एकच कंत्राटदारफलाटांची उंची वाढविण्यासाठी रेल्वेजवळ एकच कंत्राटदार असल्याचे दिसते. जोपर्यंत रेल्वे प्रशासनाविरुद्ध काही दंडात्मक कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत प्रत्येक वर्षी प्रवासी असेच मारले जाणार व रेल्वेस त्याचे काही सोयरसुतक राहणार नाही.