शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अस्वच्छतेने प्रवासी होताहेत त्रस्त

By admin | Updated: January 16, 2017 01:52 IST

पिंपरी स्टेशनची गणना होत असली तरी हे स्टेशन नियोजनाअभावी अस्वच्छता व असुविधांच्या गर्तेने पिंपरी स्टेशनला व्यापलेले आहे.

काळेवाडी : शहरातील मध्यवर्ती स्टेशन म्हणून पिंपरी स्टेशनची गणना होत असली तरी हे स्टेशन नियोजनाअभावी अस्वच्छता व असुविधांच्या गर्तेने पिंपरी स्टेशनला व्यापलेले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून फूटपाथ व इतर दुरुस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, अद्यापही ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत्त आहे.या स्थानकावर प्रवाशांसाठी बांधलेल्या स्वच्छ्तागृहाची अवस्था अतिशय गलिच्छ असून त्याची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे इमर्जन्सी म्हणूनही त्याकडे डोकावण्यास कोणत्याही प्रवाशांना इच्छा होत नाही. तसेच या स्टेशनवर दारु पिऊन भटकत फिरणारे टवाळखोर व भिकारी यांची हक्काची जागा म्हणून ते या स्टेशनवर मोकाट फिरत असतात. त्यामुळे विद्यार्थिनी व स्त्रियांना या टवाळखोरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक वेळा रेल्वे रुळावरील ओव्हरब्रिजवर काही आंबटशौकीन तरुण व तरुणी दंगामस्ती करताना दिसून येत आहेत. >भुरट्या चोरांचा उपद्रवया स्टेशनच्या परिसरात जवळच पिंपरीतील बाजारपेठ व भाजी मंडई असल्यामुळे या स्टेशनवर नेहमीच स्त्री-पुरुष प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीचाच फायदा घेण्यासाठी पाकीट मारणाऱ्या भुरट्या चोरांचाही उपद्रव अनेकवेळा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. स्टेशनच्या बाजूलाच झोपडपट्टी असल्यामुळे रात्रीच्या वेळी बाजूने दगड मारण्याचे प्रकार घडत असल्यामुळे येथील रेल्वे पोलीसही या टवाळखोरांना हटकण्याचे धाडस करण्यास धजावत नाहीत. या स्टेशनवर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर नेहमीच अनधिकृत रिक्षा, हातगाड्या व दुचाकी पार्क केलेल्या असतात.>प्रवेशद्वारावर अतिक्रमणनागरिकांच्या सोयीस्कर असणाऱ्या रस्त्यावर लोखंडी जाळ्या लावलेल्या असल्यामुळे दूध,भाजीवाले व अनेक प्रवासी घाई-गडबडीने धोकादायक पद्धतीने लोखंडी जाळीवर चढून जवळचा मार्ग स्वीकारत असतात. तसेच अनेकजण जीव धोक्यात घालून रेल्वे रूळही ओलांडत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यताही दाट असते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येनुसार व वाढणाऱ्या गर्दीनुसार लोकल गाड्यांची संख्याही वाढली पाहिजे. तसेच स्टेशनवरील सोई-सुविधा सुधारून स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे अशी सर्व प्रवासी वर्गांचीही मागणी आहे. >स्वच्छतागृहाची देखभाल नाहीपिंपरी रेल्वे स्थानक हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी मध्यवर्ती स्थानक आहे. येथून मुंबई, लोणावळा, पुणे या भागात जाण्यासाठी कामगारवर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील असते. मात्र या स्थानकावरील स्वच्छतागृहाची देखभाल केली जात नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. शिवाय स्थानकावर भिकारी, गर्दुले व टवाळखोरांची वर्दळ असते. त्यामुळे महिला प्रवाशांना असुरक्षित वाटत असते. पोलिसांकडून यांवर कारवाई करण्यास कुचराई केली जात असते.