शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

"तेजस"मधील हेडफोन घेऊन प्रवासी पसार, एलईडी स्क्रीन्सही केल्या खराब

By admin | Updated: May 25, 2017 11:22 IST

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या सोयीची आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे पुढील चार-पाच दिवसांचे आरक्षणदेखील फुल्ल आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या सोयीची आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे पुढील चार-पाच दिवसांचे आरक्षणदेखील फुल्ल आहे. परंतु बेशिस्त प्रवाशांमुळे तेजसमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला. प्रवाशांनी आसनांखाली फेकलेले उष्टे खाद्यपदार्थ तसेच बायो शौचालयांचा केलेला गैरवापर यामुळे तेजसमध्ये अस्वच्छता व दुर्गंधी पसरली.

तेजसमध्ये मोफत वाय-फाय, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. मात्र मुंबई ते करमळी हा प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी एलईडी स्क्रीनसह दिलेल्या ‘हेडफोन्स’वर डल्ला मारल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.प्रवाशांनी अनेक आसनांखाली उष्टे खाद्यपदार्थ आणि तत्सम फेकलेल्या वस्तूंमुळे गाडी कमालीची अस्वच्छ झाली होती. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असल्यामुळे हा वास अधिकच पसरला.

ट्रेनमधील बायो-शौचालयांचा वापर अयोग्य केल्यामुळे शौचालयांमध्येही दुर्गंधी पसरली. या गाडीमध्ये असलेल्या स्वयंचलित दरवाजामुळे एक प्रवासी रत्नागिरी स्टेशनवर राहून गेल्याचे समोर आले. तथापि, स्वयंचलित दरवाजे हे चोऱ्या आणि अन्य घातपाताच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.