शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट, अब्दुल सत्तार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 07:48 IST

मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोपही सध्या माझ्यावर करण्यात आले आहेत. एकप्रकारे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सत्तार यांनी केला आहे.

औरंगाबाद : मंत्रिपद न मिळालेला माझ्याच पक्षातील नेता माझ्याविरोधात कट करत असून, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे लवकरच तक्रार करणार असल्याचा खळबळजनक आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. या प्रकारामुळे शिंदे गटात सुरु असलेली अंतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे. 

राज्यात झालेला टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना दिलेले टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलेच घेरले होते. प्रसारमाध्यमांनीही याबाबत बातम्या दिल्या होत्या. मोठा गदारोळ झाल्यानंतर याबाबत अधिवेशनात कृषिमंत्री सत्तार यांनी आपली बाजू मांडली. तरीही सभागृहात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चर्चा अद्याप राज्यभर सुरूच आहे. 

या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री सत्तार यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वपक्षातील नेत्यांवरच गंभीर आरोप केला आहे. या मुलाखतीत ते म्हणाले की, ज्याला मंत्रिपद मिळाले नाही, असा स्वपक्षातील नेता माझ्याविरोधात सध्या  कट करत आहे. या प्रकाराबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहेत. 

मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोपही सध्या माझ्यावर करण्यात आले आहेत. एकप्रकारे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सत्तार यांनी केला आहे.

माझ्यावर आरोप का केले जात आहेत,  राष्ट्रवादीची माझ्यावर का चीड आहे, याचे कारण मला माहीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. आमच्यातील कोणीतरी बाहेर या बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. - अब्दुल सत्तार, कृषिमंत्री 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तार