शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ पवार यांच्या गाडीच्या चालकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:50 IST

शिक्रापूर (जि. पुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा ...

शिक्रापूर (जि. पुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करण्यात आले आहे. त्याला (सुपा, ता. पारनेर, जि. नगर) येथे बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले.

अपहरणकर्त्यांनी 'तु पार्थ पवारांचा ड्रायव्हर का? ' असे म्हणून अपहरण केल्याने कुलाबा (मुंबई) व शिक्रापूर (जि. पुणे) पोलीसही चक्रावले असून, या प्रकरणी स्वत: पार्थ पवार या घटनेच्या खोलात जावून माहिती घेण्यासाठी मुंबई व पुणे जिल्हा पोलिसांच्या संपर्कात आहेत.

याबाबत चालक मनोज सातपुते ( वय २६, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी दि. ५ रोजी रात्री ८ वाजता मुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळ उभा असताना एक लाल रंगाची ओमनी गाडी आली व तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का? आम्हाला त्यांना भेटायचे आहे, असे म्हणून त्याला गाडीच्या पुढच्या सिटवर बसविले.

मात्र, त्यापुढील काहीच आठवत नाही, असे सांगून सातपुते यांना शरिरावर काही ठिकाणी मारहाण करून थेट सुपे येथे ६ रोजी सकाळी ८ वाजता सोडल्याचे आठवत असल्याचे पोलिसांना लिहून दिले आहे.

कुलाबा पोलीस करणार तपाससातपुते यांचा मोबाईलही गहाळ झाला असून,एसटीने सणसवाडी येथे येऊन खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञातांवर अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्हा कुलाबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.

टॅग्स :parth pawarपार्थ पवार