शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
4
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
5
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
6
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
7
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
8
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
9
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
10
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
11
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
12
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
14
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
15
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
16
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
18
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
19
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
20
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

अंशकालीन कर्मचार्‍यांचा ‘पूर्णकालीन’ भ्रमनिरास !

By admin | Updated: July 14, 2014 23:58 IST

शासन शब्दाला जागत नाही: दिवसागणिक उलटत चालली वयोर्मयादा

वाशिम : गत २३ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर शासकीय कार्यालयांमध्ये राबणार्‍या अंशकालीन कर्मचार्‍यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्‍वासन वेळोवेळी देणारे शासन शब्दाला जागले नाही. दुसरीकडे, नोकरीची वयोर्मयादा दिवसागणिक उलटत चालली असल्याने हे कर्मचारी दुहेरी विवंचनेत सापडले आहेत. १९९0-९१ साली राज्य शासनाने अंशकालीन कर्मचार्‍यांची संकल्पना जन्मास घातली. त्यानुसार पदवीधर बेरोजगारास महिन्याकाठी ३00 रूपये तथा पदविकाधारक बेरोजगारांना महिन्याकाठी १00 रूपये मानधन देऊन त्यांना शासकीय कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून कामावर घेण्यात आले. त्यामुळे दफ्तर दिरंगाईला लगाम बसला आणि प्रशासनही गतीमान झाले. शासन आज ना उद्या आपल्याला पूर्णकालीन नोकरीत सामावून घेईल हा आशावाद या बेरोजगारांच्या मनात होता. तथापि, शासनाची उदासिनता पाहून १९९६-९७ साली कर्मचार्‍यांची राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्यात आली. संघटना बळकट होत असल्याचे पाहून, शासनाने या संघटनेचे पंख छाटण्यास प्रारंभ केला. कायमस्वरूपी नोकरीवर अधिकार सांगणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र घेऊन शासनाने अंशकालीन कर्मचार्‍यांना पहिला धक्का दिला. २00२- 0३ साली तमाम अंशकालीन कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवून, शासनाने अंशकालीन कर्मचारी संकल्पनेचाच गळा घोटला. १९९९ साली अंशकालीन कर्मचारी संघटनेने मंत्रालयावर विशाल मोर्चा काढला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. हे आश्‍वासन हवेतच विरले. २00९ पासून अंशकालीन कर्मचार्‍यांना शासकीय नोकरीत १0 टक्के आरक्षण शासनाने जाहीर केले होते. याशिवाय वयोर्मयादाही शिथिल केली होती. मात्र हा निर्णय लालफितशाहीतच गुंडाळलेला असल्याने अंशकालीन कर्मचार्‍यांचा पूर्णत: भ्रमनिरास झाला आहे.** कर्मचार्‍यांचा आकडा १८ हजारांच्या घरातराज्यभरात तब्बल १८ हजार २२६ अंशकालीन कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास ४ हजार कर्मचार्‍यांची नोकरीची वयोर्मयादा उलटली आहे. उर्वरित कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय अद्यापही आशेवर जगून आहेत.