लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पणजीतून पोटनिवडणूक लढविणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. भाजपाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकर यांनी पणजीतून निवडणूक लढवावी यासाठी भाजपा कार्यकर्ते, नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला आहे आणि पर्रीकर यांनीही ही मागणी मान्य केली आहे. शनिवारी कुडचडे येथे मेळाव्यात त्यांनी केलेले विधानही त्यादृष्टीने सूचक मानले जाते. कुठूनही रिंगणात उतरलो तरी कुडचडेच्या विकासावर माझे कायम लक्ष राहणार असल्याचे त्यांनी म्हटल्याची माहिती या नेत्याने दिली. पर्रीकरांनी पणजीतून पोटनिवडणूक लढविल्यास आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर यांना त्यांच्यासाठी जागा रिकामी करावी लागणार आहे.
पर्रीकर पणजीतून निवडणूक लढविणार
By admin | Updated: May 8, 2017 04:23 IST