शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

पार्किंगचा खेळखंडोबा !

By admin | Updated: January 6, 2015 01:03 IST

दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगच्या माध्यमातून कधीही असामाजिक तत्त्व आपला हेतू साध्य करू शकतात

घातपातास पोषक : प्रशासनाची उदासीनता, ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ झोपेतदयानंद पाईकराव - नागपूर दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगच्या माध्यमातून कधीही असामाजिक तत्त्व आपला हेतू साध्य करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पॅसेंजर लाऊंजच्या शेजारीच नव्हे तर अक्षरश: जेथून रेल्वेगाड्या ये-जा करतात त्या रेल्वे रुळाच्या बाजूलाही दुचाकी उभ्या करण्यात येत असल्यामुळे तेथे कधीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत रेल्वे प्रशासन कमालीची उदासीनता दाखवित असून रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ सुद्धा बेफिकीर असल्याचे दिसत आहे.नागपूर रेल्वेस्थानक हे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. परंतु येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. रेल्वेस्थानकावर पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. रेल्वे रुळावरूनही दुचाकी चालवत जाण्याचे प्रमाण वाढीस लागले असून रेल्वे प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. रेल्वेस्थानकाच्या देखभालीसाठी ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ची स्थापना दोन वर्षापूर्वी करण्यात आली. या कमिटीने सुरुवातीला नियमित बैठका घेऊन रेल्वेस्थानकावरील बाबींचा नियमित आढावा घेतला. परंतू आता ही समितीदेखील रेल्वेस्थानकाच्या बाबतीत उदासिन झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकुणच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.रेल्वे रुळाच्या बाजूलाच पार्किंग‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ स्थापन केल्यानंतर या कमिटीने पत्र काढून लोहापुलाकडील उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला पत्र देऊन तेथे रेल्वे रुळाच्या शेजारी दुचाकी उभ्या करू नये, असे फर्मान सोडले. सुरुवातीला या पत्राचे पालनही झाले. परंतु मागील वर्षभरापासून रेल्वे रुळाच्या बाजूलाच दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे एखाद्या असामाजिक तत्त्वाने दुचाकीत स्फोटके ठेवून ती रेल्वे रुळाच्या बाजूला उभी केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. परंतु तरीसुद्धा या गंभीर बाबीकडे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. पॅसेंजर लाऊंजशेजारी उभ्या राहतात दुचाकीरेल्वे सुरक्षा दलाच्या बाजूला भव्य पॅसेंजर लाऊंज तयार करण्यात आले आहे. येथे प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या आणि पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या पॅसेंजर लाऊंजला लागूनच दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. येथेही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. पार्किंगची जागा नसताना येथे खुशाल दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. परंतु यावर रेल्वे प्रशासन किंवा सुरक्षा यंत्रणाही मूग गिळून गप्प असल्याची स्थिती आहे. भविष्यातील संभाव्य धोका ओळखून तातडीने यावर पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा कुठल्याही प्रसंगी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पार्किंगची समस्या सोडविण्यात अपयशरेल्वेस्थानकावर पार्किंगची समस्या अतिशय बिकट झाली आहे.रेल्वे सुरक्षा दलासमोर शासकीय वाहनांच्या पार्किंगमध्ये जवळपास ३०० दुचाकी उभ्या करण्यात येत होत्या. परंतु या परिसरातून वर्षभरात १२ ते १४ दुचाकी चोरीला गेल्या. त्यामुळे ही डोकेदुखी बंद करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी येथील सगळ्या दुचाकी तेथून हटवून कारवाई सुरू केली. सध्या ही जागा रिकामी आहे. येथे आरपीएफचे चारचाकी वाहन उभे राहत असून इतर जागा रिकामी राहते. येथे रेल्वे प्रशासनाने अधिकृत पार्किंगचे कंत्राट दिल्यास किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना तेथे वाहने उभे करण्याची मुभा दिल्यास बऱ्याच जणांचा पार्किंगचा प्रश्न निकाली निघणार आहे. रेल्वे रुळ ओलांडून जातात दुचाकीरेल्वेस्थानकाच्या आत वाहने चालविणे हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे. रेल्वे प्रशासनाने तसा नियमच घालून दिला आहे. परंतू पूर्वेकडील संत्रा मार्केट भागात असलेल्या गुड्स शेडकडून येणाऱ्या पायी रस्त्यावरून थेट दुचाकी पश्चिमेकडील भागात नेण्यात येतात. हा गंभीर प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. परंतु तरीसुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.संत्रा मार्केट भागातही वाहतूक विस्कळीतरेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केटकडील भागात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. येथे वाहतुकीचे नियम कोणताच वाहनचालक पाळत नसल्याचे दिसून आले. संत्रा मार्केटकडील भागात वाहनचालक वाटेल तेथे आपले वाहन उभे करून थेट रेल्वेस्थानकात प्रवेश करतात. तेथे ड्युटीवर असलेले पोलिसही या वाहनचालकांना कुठलाच मज्जाव करीत नाहीत. एखाद्या वेळी एखाद्या समाजकंटकाने घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने आपल्या वाहनात स्फोटके ठेवून निघून गेल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. परंतू याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संत्रा मार्केटकडील भागात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.