शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांना छळणाऱ्या मुलांना काढले घराबाहेर!

By admin | Updated: June 25, 2017 01:05 IST

‘ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक छळ करून त्यांची जीणे हराम करणाऱ्या पुण्यातील निगडी येथील दोन मुलांना उच्च न्यायालयाने कायद्याचा बडगा दाखवून घराबाहेर काढले आहे.‘एवढेच नव्हे, तर या दोन्ही मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना आॅगस्ट महिन्यापासून निर्वाहासाठी दरमहा प्रत्येकी २,५०० रुपये द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला. जबरदस्तीने वडिलांच्या घरात बिऱ्हाडे थाटलेल्या या दोन्ही मुलांनी येत्या दोन आठवड्यांत बायकामुलांसह चंबुगबाळे आवरून जागा खाली केली नाही, तर पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर हुसकावले जावे,’ असेही न्यायालयाने सांगितले.मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर वारसाहक्क न सांगता, म्हातारपणी त्यांचा सांभाळही करावा, या उद्देशाने संसदेने सन २००७ मध्ये केलेल्या ‘मेन्टेनन्स अँड वेल्फेअर आॅफ पॅरेन्ट््स अँड सीनियर सिटिझन्स अ‍ॅक्ट’ या कायद्याच्या आधारे न्या. साधना जाधव यांनी हा आदेश दिला.न्या. जाधव यांनी ज्याचे वर्णन ‘दुर्दैवी’ असे केले, ते हे प्रकरण गिरनार बंगला, प्लॉट नं. ५९, सेक्टर २७/ए, प्राधिकरण, निगडी येथे राहणारे सुरेंद्र नरसगोंडा पाटील (८० वर्षे) व त्यांच्या पत्नी सुनंदा यांच्या कुटुंबाचे आहे. संतोष आणि संदीप या दोन विवाहित मुलांनी सांभाळ करण्याऐवजी पद्धतशीर छळ सुरू केल्याने, या वृद्ध दाम्पत्याने नाईलाजाने उपयुक्त कायद्याचा आधार घेऊन दाद मागितली होती. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आई-वडिलांच्या बाजूने निकाल दिला होता. अपीलात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनीही तो निकाल कायम ठेवला होता. त्याविरुद्ध संतोष याने केलेली रिट याचिका न्या. जाधव यांनी फेटाळली.सुरेंद्र व सुनंदा यांनी स्वअर्जित पैशातून हा बंगला बांधला होता. गेल्या १० वर्षांतील घटनांचा आढावा घेत, न्या. जाधव यांनी निकालपत्रात नमूद केले की, वडील आजारी असताना, संतोषने एका सामंजस्य करारावर (एमओयू) त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यानुसार, त्याने वडील आपल्याला कधीही घरातून बाहेर काढणार नाहीत, असे लिहून घेतले. आपण पहिल्या मजल्यावर राहू व आई-वडिलांनी तळमजल्यावर राहावे, असेही त्याने ठरविले. शिवाय दरमहा त्यांना ठरावीक रक्कम खर्चासाठी देण्याचेही त्याने कबूल केले. प्रत्यक्षात त्याने याचे कधीच पालन केले नाही.या वृद्ध दाम्पत्यास सुजाता नावाची मुलगीही आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. न्या. जाधव यांनी म्हटले की, विवाहानंतर स्वतंत्र जागा घेऊन आपापले संसार करणाऱ्या संतोष व संदीप यांनी, आई-वडील कदाचित घर बहिणीला देऊन टाकतील, या समजापोटी पुन्हा या बंगल्यात येऊन मुक्काम ठोकला. वास्तविक, कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीत मुलांएवढाच मुलींचाही हक्क असताना, या दोन्ही भावांचे हे वर्तन विसंगत आहे.खास करून न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दोन्ही मुलांनी बंगल्याच्या मोकळ््या जागेत छप्पर टाकून, तेथे घरातील सामान रचून ठेवणे आणि सुनेने सासू-सासऱ्यांविरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार दाखल करणे, या गोष्टींवरून त्यांची आई-वडिलांचा छळ करण्याची मानसिकताच दिसून येते, असेही न्यायालयाने म्हटले.