शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

क्षमापना ही देणगी

By admin | Updated: September 10, 2016 01:06 IST

तसेच दुसऱ्यांना क्षमा करणे व दुसऱ्यांची क्षमा मागण्याने मन प्रसन्न व हलके होते

पुणे : मानवी जीवनात प्रेम, शांती यांना जसे महत्त्व आहे; तसेच दुसऱ्यांना क्षमा करणे व दुसऱ्यांची क्षमा मागण्याने मन प्रसन्न व हलके होते. त्यामुळे जीवन सुखकर व आनंददायी होते. जैन धर्मातील क्षमापना ही विश्वाला मिळालेली देणगी आहे, अशा शब्दांत क्षमापनाचे महत्त्व सामुदायिक क्षमापना कार्यक्रमात विशद करण्यात आले.जितो पुणे व श्री जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी जैन धर्मातील चार पंथांच्या सामुदायिक क्षमापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प. पू. ललीतप्रभजी म. सा., प. पू. अक्षय दर्शनाजी म. सा., प. पू. दिव्य दर्शनाजी म. सा., प. पू. विराग दर्शनाजी म. सा., साध्वी चंदनाजी म. सा., अक्षयज्योती म. सा., चरण रत्ना म. सा., विराग रत्न म. सा., जितेंद्र मुनीश्री म. सा., प्रभव मुनीश्री म. सा., प्रशमीत मुनीश्री म. सा., जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, मुख्य सचिव नरेंद्र छाजेड, संयोजक राजेंद्र बाठिया, अशोक गुंदेचा, ललीत गुंदेचा, मंदिर व स्थानकांचे विश्वस्त आदी उपस्थित होते.जीवनात क्षमा, प्रेम, शांती या भावनांना खूप महत्त्व आहे. ज्या दिवशी आपण रागवतो तो दिवस वाईट जातो, तर ज्या दिवशी रागवत नाही तो दिवस छान जातो. जीवनात क्षमा करणे आणि रागावणे या दोहोंचे परिणाम सर्वांनीच अनुभवलेले असतात. माणूस रागवतो तेव्हा त्याच्या अहंकाराला ठेच पोहोचते आणि तो दुसऱ्याला दुखावतो. आपण कळत-नकळतपणे अनेकांना दुखावलेले असते. त्या सर्वांची क्षमापनाच्या निमित्ताने माफी मागायची आहे; तसेच एकमेकांना माफही करायचे, असे ललीतप्रभजी म. सा. यांनी सांगितले.क्षमा केल्याने प्रसन्नता लाभते. क्षमा करणाऱ्याच्या व्यक्त चेतनामध्ये बदल तर जाणवतोच; पण अव्यक्त चेतनांमध्येही बदल जाणवतो, असे प. पू. अक्षय दर्शनाजी म्हणाल्या.जितो नेहमी समाजाला एकत्र आणण्याचे काम करते आहे. क्षमापना कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. जितो वर्षभर अनेक कार्यक्रम व उपक्रम राबवत असते. या कामात सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभते, असे जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.जितोच्या वतीने उपस्थित महिलांना ‘सफल जीवन का सिक्रेट’ आणि पुरुषांना ‘बदले सोच, बदले विचार’ हे पुस्तक भेट देण्यात आले.