शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी, हिंगोलीत सव्वाचार कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा, वसुलीची प्रक्रिया सुरू; आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:27 IST

आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणाºया केंद्र शासनाच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांनी ४ कोटी ३९ लाख ६० हजार २४६ रुपयांचा घोटाळा केला असून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.

अभिमन्यू कांबळे परभणी : आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणाºया केंद्र शासनाच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांनी ४ कोटी ३९ लाख ६० हजार २४६ रुपयांचा घोटाळा केला असून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.दोन वर्षांपूर्वी समाजकल्याण व आदिवासी विभागाकडून मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणाºया शिष्यवृत्तीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर विशेष चौकशी पथकाने (टास्क फोर्स) परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३५० महाविद्यालयांची तपासणी केली. आॅगस्ट २०१७ मध्ये चौकशी अहवाल तयार केला. नोव्हेंबरमध्ये तो राज्य शासनाला सादर केला.दोषी ८३ महाविद्यालयांपैकी फक्त ४ महाविद्यालये हिंगोली जिल्ह्यातील आहेत. हिंगोलीतील शिष्यवृत्ती घोटाळा जवळपास १० लाख; तर परभणीत ४ कोटी २९ लाख हडपले. शिष्यवृत्ती घोटाळ््याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया आदिवासी विभागाने सुरू केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम शासनाकडे ३१ डिसेंबरपर्यंत भरण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.साडेपाच लाख जमापरभणी जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांनी साडेपाच लाख आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे जमा केले आहेत. उर्वरित महाविद्यालयांनाही तंबी देण्यात आली असून त्यांना पुढील आठवडाभरात रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे.कसा केला घोटाळा?एकाच शैक्षणिक वर्षात दोन वर्गात विद्यार्थी दाखवून दोन वेळा शिष्यवृत्ती वाटप केली गेली. बनावट शाळा सोडल्याचा दाखला, अभ्यासक्रम पूर्ण न करता दुसºया अभ्यासक्रमास, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश दिलेले, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मान्यता नसलेले, जात वैधता प्रमाणपत्र नसलेले आदींना एकाच वर्षात शिष्यवृत्तीव फ्री शीपही देण्यात आली. दुसºयाच्या नावाचे दस्ताऐवज जोडून व एकाच वर्गातील विद्यार्थ्याला दोन ते तीन वेळा शिष्यवृत्ती वाटप केली गेली. लेखापरीक्षणामध्ये हे उघड झाले.परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी घेतलेली ४ कोटी ३९ लाख ६० हजार २४६ रुपयांची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत. तशा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.- डॉ. विशाल राठोड, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, कळमनुरी