शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पनवेलचे ‘कलिंगड’राज संपुष्टात

By admin | Updated: May 4, 2017 06:09 IST

सुमारे ४० वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ४वर खांदा वसाहतीजवळील रस्त्याच्या कडेला अगदी थाटात वसलेले पनवेलमधील कलिंगडराज

वैभव गायकर / पनवेलसुमारे ४० वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ४वर खांदा वसाहतीजवळील रस्त्याच्या कडेला अगदी थाटात वसलेले पनवेलमधील कलिंगडराज संपुष्टात आले. महामार्गाच्या रुं दीकरणात या कलिंगड विक्रे त्यांचा बळी गेला आहे. पावसाळ्याचे काही महिने सोडले, तर वर्षभर सुरू असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच डबघाईला आला आहे. सुमारे ६० ते ७० कलिंगड विक्रे त्यांचे कुटुंब येथील व्यवसायावर अवलंबून होते. याठिकाणाहून ये-जा करणारे हजारो वाहनचालक आपली तृष्णा भागविण्यासाठी या ठिकाणी आवर्जून थांबत असत. मात्र, येथील कलिंगडाचे राज आता संपुष्टात आले आहे. यापूर्वी जुना मुंबई-पुणे महामार्ग याच ठिकाणाहून जात होता. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर त्याकाळी या विके्र त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. निम्म्यापेक्षा जास्त गाड्या या द्रुतगती महामार्गाने जात असल्याने या विक्रे त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला होता. मात्र, कालांतराने पुन्हा एकदा धंद्यावर चांगली वचक बसली. मात्र, कळंबोली ते पळस्पे या मार्गाच्या रुं दीकरणात या व्यावसायिकांचा बळी गेला. तालुक्यातील खुटारी, तळोजा, नितळस आदी ठिकाणचे हे व्यावसायिक आहेत. जवळजवळ ४० वर्षे हा व्यवसाय दिमाखात सुरू होता. कर्नाटक, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील कलिंगड याठिकाणी विक्र ीसाठी ठेवले जात असत. हा व्यवसाय जरी अनधिकृत जागेवर असला तरी याबाबत कोणाचीच तक्र ार नसायची. ये-जा करणाऱ्या वाटसरूंची प्रचंड उकाड्यात तहान भागवणाऱ्या कलिंगडाच्या खापा खाण्याचा मोह याठिकाणाहून जाणाऱ्या कोणालाच आवरता आला नाही, हे तेवढेच सत्य आहे. त्यामुळेच याबाबत कोणीच तक्रार केली नाही. सात महिन्यांपूर्वी पनवेल महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत धडक मोहीम राबवत या व्यावसायिकांवर कारवाई केली. या विक्रेत्यांचा व्यवसाय वाचविण्यासाठी काही राजकीय मंडळीही पुढे सरसावली होती. मात्र, आयुक्त शिंदे यांच्यापुढे कोणाचेच चालले नाही. या कारवाईनंतर वर्षानुवर्षे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या विके्र त्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कलिंगड विक्रेत्यांनी घाबरत याठिकाणी व्यवसाय थाटला आहे, तर काही विक्रेते फिरत्या पद्धतीने बैलगाडीच्या साहाय्याने खारघर, कळंबोली, कामोठे आदी ठिकाणी कलिंगड विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या ७०पेक्षा जास्त दुकानदारांच्या शेकडो व्यक्तींवर हा व्यवसाय बंद झाल्याचा परिणाम झाला आहे. आमचे व्यवसाय बंद करण्यापूर्वी प्रशासनाने आमचे या महामार्गावरच कुठेतरी पुनर्वसन करणे गरजेचे होते. हा व्यवसाय केवळ आमच्या फायद्यासाठी नसून ये-जा करणाऱ्या वाटसरूंचीही मोठी पंचाईत झाली आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. - उमेश पाटील, कलिंगड विक्रेता