कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दोन पिस्तुलांतून पाच गोळ्या झाडल्या गेल्याचे फॉरेन्सिक लॅबने केलेल्या तपासणी अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे मारेकरी एक नव्हे दोन असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासून ‘आरसी’ आणि ‘एसटी’ गँगच्या सदस्यांची उचलबांगडी सुरू केली.मंगळवारी दुपारी हा अहवाल कोल्हापूर पोलिसांना प्राप्त झाला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत सापडलेले पुरावे आणि पानसरे यांच्यावरील हल्ल्यातील पुरावे जुळतात की नाहीत, या दिशेनेही प्रयोगशाळेत तपासणी केली, परंतु या अहवालाबाबत गोपनीयता बाळगल्याचे सूत्रांनी सांगितले. पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्यभरातील २५ विशेष पथके करीत आहेत. तपासात अद्याप एकही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. (प्रतिनिधी)
पानसरे यांच्यावर दोघांनी झाडल्या गोळ्या !
By admin | Updated: March 12, 2015 02:01 IST