शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंना एसीबीची क्लीनचिट

By admin | Updated: December 22, 2016 04:44 IST

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना कथित चिक्की घोटाळ््याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लीनचिट

मुंबई : महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना कथित चिक्की घोटाळ््याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लीनचिट दिली आहे. त्यासंदर्भातील सर्व फाईल एसीबीने बंद करुन त्याचा अहवाल गृहविभागाला पाठवला आहे.अंगणवाडीच्या वस्तूसाठी पंकजा मुंडे यांनी नियम धाब्यावर बसवले. तसेच त्यांनी एका दिवसांत २०६ कोटींच्या वस्तूसाठी २४ कंत्राटे दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या चिक्की घोटाळ््याप्रकरणी चौकशी करण्यासाठी २४ जून २०१५ रोजी एसीबीकडे विरोधी पक्षांकडून तक्रार करण्यात आली. त्यानुसार एसीबीने तपास सुरु केला. मात्र तपासात तक्रार अर्जामध्ये घेतलेल्या आक्षेपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त केशव पाटील यांनी दिली आहे. एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत अंगणवाडीसाठी एका दिवसात २४ कंत्राटे का दिली? असा आक्षेप होता. (विशेष प्रतिनिधी)आज सत्य जनतेसमोर आलेच...एसीबीच्या अहवालाने आमच्या विभागाला न्याय मिळाला. विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट झाले. चिक्की व इतर वस्तूंची खरेदी ही नियमानुसारच केलेली होती. हे मी वारंवार विधिमंडळात आणि बाहेरही सांगितले. मात्र, विरोधकांनी त्याचे राजकारण करीत आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी निराधार आरोप केले पण आज सत्य जनतेसमोर आलेच. - पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण मंत्रीकॉँग्रेस-राष्ट्रवादीची टीकास्वत:च चोरी केलेल्या चोराच्या साक्षीवर एसीबीने या प्रकरणी क्लीन चीट दिली आहे. महिला बालकल्याण विभागाच्या खरेदी प्रक्रियेत माफिया कार्यरत असून राज्य सरकारचे या माफियांना संरक्षण आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे सरकारची दडपशाही आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तर मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांचे संरक्षण कसे करतात त्याचे हे उदाहरण आहे. आम्ही या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढू व या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला.मुंडे यांना दुसरा दिलासाअंगणवाड्यांसाठी घरपोच आहार पुरविण्याचे कंत्राट देण्यासाठी अवलंबिलेली निविदा प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच योग्य ठरवित पंकजा मुंडे यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर बुधवारी चिक्की प्रकरणात त्यांना एसीबीने दिलासा दिला.