शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्र्यांची समज!

By admin | Updated: July 11, 2016 06:02 IST

‘आपण वरिष्ठ मंत्री असल्याने परिषदेला उपस्थित राहिले पाहिजे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना समज दिली.

मुंबई/अहमदनगर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात जलसंधारण व रोजगार हमी, ही महत्त्वाची खाती काढून घेतल्यामुळे नाराज झालेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सिंगापुरातील जागतिक पाणीपरिषदेला उपस्थित राहाणार नसल्याचे टिष्ट्वटरवरून जाहीर करताच, ‘आपण वरिष्ठ मंत्री असल्याने परिषदेला उपस्थित राहिले पाहिजे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली. दरम्यान, परळी व पाथर्डी (जि. नगर) येथील पंकजा समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून आपला राग व्यक्त केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले.

रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी रात्री उशिरा खातेवाटपाची यादी जाहीर केली. या फेरबदलात पंकजा मुंडे, विनोद तावडे व प्रकाश मेहता या तीन वरिष्ठ मंत्र्यांचे पंख छाटले  गेले. पंकजा यांच्याकडील जलसंधारण व रोजगार हमी अशी दोन खाती काढून ती अनुक्रमे प्रा. राम शिंदे व जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली. मंत्रिमंडळात रावल यांचा नव्याने समावेश झाला आहे, तर शिंदे यांना कॅबिनेटमध्ये बढती देण्यात आली आहे.

जागतिक पाणी परिषदेसाठी सिंगापुरला गेलेल्या पंकजा यांना तिथे या फेरबदलाची बातमी कळताच ‘आता आपण जलसंधारण मंत्री नसल्यामुळे सिंगापूरमध्ये होणाऱ्या पाणी परिषदेला उपस्थित राहू शकत नाही’ असे टिष्ट्वट करून आपली नाराजी व्यक्त केली. त्यावर लागलीच मुख्यमंत्र्यांनी समजूत काढत ‘तुम्ही वरिष्ठ मंत्री असल्याने सरकारची प्रतिनिधी म्हणून परिषदेला उपस्थित राहा’ असा आदेश पंकजा यांना टिष्ट्वटरवरूनच दिला!

पाथर्डीत निदर्शनेजलसंधारण खाते काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या पंकजा समर्थकांनी पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मुकुंद गर्जे, पंचायत समितीचे माजी सभापती संपत कीर्तने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंकजा आणि वादमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसात चिक्की खरेदी घोटाळा समोर आला. पंकजा यांच्याकडील महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील मुलांसाठी खरेदी केलेली चिक्की निकृष्ट असल्याचा आरोप झाला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. 

जायकवाडी धरणातील पाणी औरंगाबादेतील दारू उत्पादक कारखान्यांना देण्यास विरोध झाल्यानंतर पंकजा यांनी दारू कारखान्यांची बाजू घेतली. पंकजा यांच्या पतीच्या नावे मद्यनिर्मितीचा कारखाना असल्याचे समोर आले.शनिशिंगणापुरातील शनि चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यावरून आंदोलन पेटले असता पंकजा यांनी देवस्थानची बाजू घेत महिलांनी परंपरेचे पालन केले पाहिजे, असा सल्ला दिला होता.

दुष्काळात होरपळुन निघालेल्या लातुरातील बंधाऱ्याच्या कामाला भेट देताना काढलेल्या सेल्फीवरून बरेच वादंग उठले होते.‘जलयुक्त शिवार’ ही मुख्यमंत्र्यांनी आखलेली महत्वाची योजना असताना पंकजा यांनी जलसंधारण कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. सतत वादग्रस्त ठरत असल्याने पक्षश्रेष्ठीही नाराज