शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगड ते विशालगड भ्रमंती एका दिवसात फत्ते

By admin | Updated: July 11, 2017 02:41 IST

पन्हाळगड ते विशालगड या ऐतिहासिक वाटेवर ७४ शिवप्रेमींनी सलग पदभ्रमंती करत हा अवघड ट्रेक एका दिवसात पूर्ण केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पन्हाळगड ते विशालगड या ऐतिहासिक वाटेवर ७४ शिवप्रेमींनी सलग पदभ्रमंती करत हा अवघड ट्रेक एका दिवसात पूर्ण केला आहे. जिजाऊ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या ट्रेकमध्ये पावनखिंडीतील महापराक्रमाला श्रद्धांजली वाहण्यात आली.या मोहिमेबाबत ट्रेकर चंद्रकांत साटम यांनी सांगितले की, १२ जुलै १६६० रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले होते. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळच्या सुमारास महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले. या समर प्रसंगात बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि ज्ञात व अज्ञात मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिले होते. त्या बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी जिजाऊ प्रतिष्ठान गेल्या १० वर्षांपासून या ट्रेकचे आयोजन करत आहे. या भ्रमंतीदरम्यान मूळ इतिहासाला उजाळा दिला जातो. या वर्षी या वाटेवर ११ ते ५८ वयोगटातील तब्बल ७४ शिवप्रेमींनी एकदिवसीय पदभ्रमण केले. महत्त्वाची बाब म्हणजे या मोहिमेत महाराष्ट्रासह हैदराबाद आणि दिल्ली या शहरांतील दुर्गप्रेमींनीही सहभाग घेतला होता. मोहिमेतील वैशिष्ट्य म्हणजे इतिहास जागवत सर्व दुर्गप्रेमी सलग २२ तास चालत राहिले. त्यामुळे दुर्गप्रेमींच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची चाचणी करणारी ही पदभ्रमण मोहीम होती.छोट्या मावळ्यांनी लक्ष वेधले : एकूण ७४ दुर्गप्रेमींमध्ये याना कोकणे (११ वर्षे) आणि पालवी चव्हाण (१० वर्षे) या चिमुरडींनी ४० किमी अंतर गाठून पांढर पाणीपर्यंत पदभ्रमण केले. तर जिजाई कोकणे (१६ वर्षे) या तरुणीने पन्हाळगड ते विशाळगड हे अवघड अंतर सलग पदभ्रमण करत पूर्ण केले. ७४ दुर्गप्रेमींपैकी तब्बल ४१ सदस्यांनी संपूर्ण मोहीम फत्ते केली.अवघ्या १९ तासांत पूर्ण केली मोहीम सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी हा ट्रेक अवघ्या १९ तासांत पूर्ण केला. रघुवीर यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेत सामील होत आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने ट्रेक पूर्ण करणे कठीण होते. अखेरच्या टप्प्यात वरुण राजाने हजेरी लावली. त्यामुळे उत्साहात भर पडल्याने शेवटचे १६ किलोमीटर अंतर अवघ्या अडीच तासांत पार केले. अधिकाधिक युवा वर्गाने या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.