शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पंढरीची वारी होणार निर्मल वारी

By admin | Updated: June 24, 2016 14:26 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यावर्षी ‘ निर्मल वारी’ म्हणून ओळखला जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २४ :-  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यावर्षी ‘ निर्मल वारी’ म्हणून ओळखला जाणार आहे. यासाठी पालखी मार्गावर वारक-यांसाठी शासन व सामाजिक सेवा संस्थेच्या मदतीने प्री-फॅब्रिकेटेड स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून या उपक्रमामुळे वारी निर्मल व सुंदर होणार असल्याचे मत विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.
आषाढी वारीच्या नियोजन व  कामांचा आढावा घेण्यासाठी  पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकित ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी रणजित कुमार,  पोलिस अधिक्षक  विरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे, प्रांतधिकारी संजय तेली व दादासाहेब कांबळे, तहसिलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे,कार्यकारी अभियंता  एस.टी राऊत, मुख्यधिकारी अभिजित बापट, शंकर गोरे, एस.टी चे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, तालुका पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, जलसंपदा विभागाचे श्री.पडघमल उपस्थित होते.
  विभागीय आयुक्त म्हणाले, संपुर्ण पालखी मार्गावर  ठिकठिकाणी वारक-यांनी शौचालयाचा वापर करावा, यासाठी  जनजागृती करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये 500 तर संत तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळ्यामध्ये 300 शौचालय उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी  पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीची देखील मदत घेतली जाणार आहे.  त्याचबरोबर गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात राबविलेल्या आपत्ती प्रतिसाद प्रणालीची यंत्रणा इतर जिल्ह्यात देखील राबविण्यात येणार आहे.  तीर्थक्षेत्र विकास आरखड्यातून मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे तात्काळ पुर्ण करण्यात येतील. शहरात सी.सी.टीव्ही. यंत्रणा उभारण्याबाबत संबंधित यंत्रणेकडून तांत्रिक बाबी तपासूण  निर्णय घेण्यात येणार आहे.तसेच भंडीशेगांव, पिराची कुरोली व माळशिरस येथे पालखी तळांचे मुरमीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बैठकीत सफाई कामगारंच्या मागण्यांचा आढावाही घेण्यात आला.
तत्पुर्वी विभागीय आयुक्तांनी  प्रशासनाकडून भाविकांना देण्यात येणा-या सोयी-सुविधांची पाहणी केली. त्यामध्ये  65 एकर ,पत्राशेड तसेच चंद्रभागा बसस्थानक, नवीन बसस्थानक येथे सुरु असलेल्या शौचालयाच्या कामांची पाहणी आवश्यक त्या सुचना संबंधितांना केल्या. यावेळी  बैठकीत नगरपालिका, आरोग्य विभाग,सुलभ शौचालय प्रादेशिक परिवहन, एस.टी.महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच संबधित विभागाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी संबधित विभागाची अधिकारी उपस्थित होते.