- ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - पंढरपुरातील एका डॉक्टराकडे 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन 5 लाख रुपयांची खंडणी वसुल केल्या प्रकरणी 5 जणांना पंढरपूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अतुल विलास हावळे ( रा. इसबावी, पंढरपूर) यांच्या माऊली रुग्णालयात जाऊन 7 जणांनी दमदाटी सुरु केली. यावेळी 5 जणांपैकी एकाने पत्रकार असल्याचे सांगितले. तर इतर लोकांनी केंद्रीय मानव अधिकार विभागाचे पदाधिकारी असल्याचे सांगितले. डॉक्टर तुमच्या विरुध्द अनेक तक्रारी आल्याचे सांगुन 20 लाखाची मागणी केली. डॉक्टरांकडुन 5 लाख रुपयांचा चेक घेतला. यावेळी डॉक्टराच्या पत्नी सुषमा हावळे घरातील सोने मोडुन आणखी पैसे आणते असे सांगुन शहरात आल्या. पैसे घेऊन घरी जाताना शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामुळे पो.नि. विठ्ठल दबडे, सपोनि. डि. एस. खाडे, पो.हे.कॉ. तैबद्दीन मुंडे, पो. ना. जे. बी. माळी यांनी घटना स्थळी तत्काळ भेट दिली. यामध्ये 4 जणांना अटक करुन 5 लाख रुपयांचा चेक ताब्यात घेतला आहे. रविवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.