शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

पंचगंगा उगम रूपात अंबाबाई...

By admin | Updated: September 28, 2014 18:02 IST

गंगा, सरस्वती, भद्रा, शिवा आणि कुंभी या पाच नद्यांच्या संगमाने निर्माण झालेल्या पंचगंगा उगम रूपात नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (रविवारी) करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा बांधण्यात आली.

- दिवसभरात तीन लाख भाविकांनी घेतले देवीचे दर्शन - कोल्हापूर हाऊसफुल्ल कोल्हापूर : करवीर क्षेत्राची जीवनदायिनी म्हणजे पंचगंगा नदी... सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाने करवीर नगरी महायज्ञ केला. त्यासाठी या क्षेत्री साक्षात गंगा, सरस्वती, भद्रा, शिवा आणि कुंभी या पाच नद्यांच्या संगमाने निर्माण झालेल्या पंचगंगा उगम रूपात नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (रविवारी) करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा बांधण्यात आली. सुट्टीचा दिवस असल्याने आज दिवसभरात तीन लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्श़न घेतले. यामुळे अवघ्या कोल्हापूरला जत्रेचे स्वरूप ्आले आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर ही पूजा बांधण्यात आली. ब्रह्मदेवांना करवीर नगरी महायज्ञ करायचा होता. त्याच्या पूर्ततेसाठी अवभृत स्नान करणे आवश्यक होते. तसे महान तीर्थ या क्षेत्री असावे, म्हणून वसिष्ठ ऋषींनी सरस्वती, विश्वामित्रांनी भोगावती, कश्यपांनी तुळशी, गालवांनी भद्रा, गर्गांनी कुंभी अशा पाच नद्या बोलावल्या. त्या पंचनदीकांपैकी भोगावती-साक्षात गंगा, सरस्वती, भद्रा म्हणजे विष्णू, शिवा म्हणजे शंकर, कुंभी म्हणजे ब्रह्मा आहेत. हे पाचही देवता पंचगंगा नावाने ओळखल्या जातात. हातात वरद कमळ आणि कुंभ धारण करणारी ही गंगा अशेष पापहारिणी म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ शुद्ध दशमीला या पंचगंगेचा प्रकटदिन उत्सव केला जावा, असा करवीर महात्म्यात उल्लेख आहे. ही पूजा श्रीपूजक सागर मुनीश्वर, रवी माईनकर यांनी बांधली. पूजेची संकल्पना उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर यांची असून, मूर्ती सर्जेराव निगवेकर व प्रशांत इंचनाळकर यांनी साकारल्या आहेत.