मुंबई : देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा १ आॅगस्टपासून अस्तित्वात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा असेल.ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हानिर्मितीवर मंत्रिमंडळाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. पालघरसाठी १४८ कोटी ३६ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, २५० कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्चास, फर्निचर खरेदीसाठी ६७ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ही एकूण रक्कम ४६५ कोटी ८९ लाख इतकी आहे. आदिवासी जनतेला शासनाच्या सोयीसुविधांचा लाभ होण्यासाठी यापूर्वी सुरू करण्यात आलेले जव्हार येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे कार्यालय सुरूच राहणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी विविध विभागांंची एकूण ५६ प्रशासकीय कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी पदनिर्मितीची कार्यवाहीही केली जाणार आहे. कुठल्याही शासकीय सुविधा न पुरवता विभाजनाची घोषणा केवळ राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली, असा आरोप शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केला. पालघरनंतर राज्यात आणखी काही नवीन जिल्हे निर्माण करावेत, अशी मागणी शुक्रवारी समोर आली. (विशेष प्रतिनिधी) - अधिक वृत्त/हॅलो
पालघर नवा जिल्हा
By admin | Updated: June 14, 2014 04:22 IST