शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Palghar: पालघरमध्ये ऑन ड्युटी पोलिसावर हल्ला, ९ जणांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:24 IST

Palghar Police Assault Case: पालघरमध्ये ऑन ड्युटी पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी दोन महिलांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पालघर येथील नायगाव पूर्व परिसरात आज मध्यरात्री ऑन ड्युटी पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना प्रिन्स ढाबाजवळ मध्यरात्री १२.४० वाजताच्या सुमारास घडली. आरोपींनी धोकादायक ठिकाणी डंबर पार्क केला. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने डंबर घटनास्थळावरून हलवण्यात सांगितला. मात्र, त्यामुळे वाद पेटला आणि आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल यांना मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ विक्रम बोडखे यांनी रस्त्यात धोकादायक ठिकाणी पार्क केलेल्या डंपरच्या चालकांना त्यांचे वाहन तिथून हलवण्याची विनंती केली. मात्र, त्यामुळे संतापलेला डंपर चालक सुनील रघुनाथ राठोड आणि त्याच्या साथीदारांनी कॉन्स्टेबल बोडखे यांना मारहाण केली. याप्रकरणी एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नऊ जणांविरोधात गुन्हा दाखलदरम्यान, सविता राठोड, रुतिक राठोड, अनिल राठोड, प्रवीण राठोड, कुशल चव्हाण, पूजा कुशल चव्हाण आणि रेखा अप्पाराव चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. इतर दोन जणांची अद्याप ओळक पटलेली नाही. आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याला धमकावण्याचा आणि हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आरोपींवर पोलीस कर्मचाऱ्याला त्यांच्या अधिकृत कर्तव्यात अडथळा आणण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमवल्याचा आरोप आहे.

अद्याप कोणालाही अटक नाहीआरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, गुन्हेगारी धमकी, बेकायदेशीर जमणे आणि कर्तव्यात अडथळा निर्माण करणे, अशा गुन्ह्यांचा यांचा समावेश आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक रोशन देवरे तपास करत आहेत.

टॅग्स :palgharपालघर