शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मश्री’ने गौरव केलात, त्याचे ओळखपत्र द्या ना! बीडमधील शब्बीर मामूंची अनोखी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:26 IST

देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला. आता भारत सरकारने या संदर्भातील ओळखपत्र द्यावे, यासह इतर दोन मागण्या शब्बीर मामू यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत. 

- शिरीष शिंदे बीड : शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथील शब्बीर सय्यद उपाख्य शब्बीर मामू यांना सलग वीस वर्षे नि:स्वार्थपणे गोसेवा केल्याचे फलित म्हणून मार्च २०१९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला. आता भारत सरकारने या संदर्भातील ओळखपत्र द्यावे, यासह इतर दोन मागण्या शब्बीर मामू यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. शब्बीर मामू व त्यांचे कुटुंबीय आजघडीला जवळपास १२५ गाई व कालवडी सांभाळत आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणाचीही मदत न घेता गाईंचा सांभाळ केला आहे. मात्र सध्या उन्हामुळे या भागात पाण्याची टंचाई भासत आहे. दावणीला असणारी जनावरे डोंगरावर नेऊन चार किलोमीटर पायपीट करून सर्व जनावरांना पाणी पाजावे लागत आहे. जनावरांची पाण्याची सोय जागेवर व्हावी, यासाठी कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना व गाईंसाठी पिण्याच्या पाण्यासाठी हौद द्यावा, अशी मागणी केलेली आहे. त्यांनी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची भेट घेऊन या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे.  तीन मागण्यांचे दिले स्मरणपत्र  पद्मश्री पुरस्कारप्राप्त शब्बीर मामू यांनी भारत सरकारचे ओळखपत्र द्यावे, गाईंना पिण्यासाठी पाण्याचा हौद मिळावा व कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना मिळावी, यासाठी १२ जून २०१९ रोजी अर्ज केला होता. परंतु, अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने त्यांनी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे स्मरण करून देणारे पत्र नुकतेच दिले आहे.  प्रत्येक व्यक्तीला त्याचे ओळखपत्र असते. त्याचप्रमाणे भारत सरकारने ओळखपत्र द्यावे. गाईंच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना व पाण्याच्या हौद द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यावर सकारात्मकपणे निर्णय घेण्यात येईल, असे अपेक्षित आहे.- शब्बीर सय्यद, पद्मश्री पुरस्कार मानकरी.  पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तीला ओळखपत्र देता येते का, याबद्दल शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. - तुषार ठोंबरे, अपर जिल्हाधिकारी, बीड.