शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्कुबा डायव्हिंग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता

By admin | Updated: January 22, 2015 02:00 IST

‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्कुबा डायव्हिंग अ‍ॅण्ड अ‍ॅक्वाटिक स्पोटर््स’ या स्कुबा डायव्हिंग सेंटरला मंगळवारी ‘पॅडी’या आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता मिळाली आहे.

संदीप बोडवेल्ल मालवण (जि़सिंधुदुर्ग)महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे उभारलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्कुबा डायव्हिंग अ‍ॅण्ड अ‍ॅक्वाटिक स्पोटर््स’ या स्कुबा डायव्हिंग सेंटरला मंगळवारी ‘पॅडी’या आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे हा प्रकल्प जगाच्या नकाशावर येणार असून, आशिया खंडातील हा एकमेव प्रकल्प असेल.‘पॅडी’चे एशिया पॅसिफिकचे विभागीय व्यवस्थापक अँड्रेस अवूर यांनी आॅक्टोबरमध्ये स्कुबा डायव्हिंग सेंटरला भेट देऊन निकषांची तपासणी केली होती. आंतरराष्ट्रीय मानकानुसार सर्व निकष पूर्ण केल्यानंतर येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता मिळाली आहे. या संस्थेशी संलग्न राहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग प्रकल्प हाती घेतला आहे. पॅडी म्हणजे काय ?प्रोफेशनल असोसिएशन आॅफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर्स (पॅडी) ही आॅस्ट्रेलियातील स्कुबा डायव्हिंग सेंटर्सचे मानके निश्चित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगभरात १८० देशांपेक्षा जास्त देशांमध्ये ‘पॅडी’ची मान्यता असलेली स्कुबा डायव्हिंग सेंटर्स आहेत. पॅडीची मान्यता मिळालेले ‘इसदा’ हे भारतातील पहिले व एशिया पॅसिफिकमधील महत्त्वाचे एक स्कुबा डायव्हिंग सेंटर ठरले आहे.असे आहेस्कुबा डायव्हिंग सेंटऱ़़तारकर्ली येथील या डायव्हिंग सेंंटरमध्ये १० मीटर खोलीचा स्विमिंग टँक, प्रशस्त व अद्ययावत क्लासरूम, संगणकीय लॅब, चेंजिंग रूम, आॅक्सिजन युनिट, फिल्टरेशन युनिट यांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकन बनावटीच्या तीन स्पीड बोटींचाही समावेश यात आहे.गेल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळालेले आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जगाच्या नकाशावर येत आहे.- डॉ. सारंग कुलकर्णी, जनरल मॅनेजर अँड चीफ इन्स्ट्रक्टर, इसदा, तारकर्लीजगातील स्कुबा डायव्हिंग सेंंटरला मान्यता देणाऱ्या पॅडी संस्थेने तारकर्लीच्या सेंटरला मान्यता दिली, ही देशाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या सेंटरचा लाभ घेण्याऱ्यास आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळेल.- सुबोध किन्हळेकर, व्यवस्थापक, साहसी क्रीडा विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई