शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पबजी, तीन पत्ती खेळताय? जरा जपून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 06:02 IST

डेबीट, क्रेडीट कार्डची माहिती घेत पॉर्इंटची खरेदी करणारे रॅकेट सक्रीय

मुंबई : पबजी, तीन पत्ती यांसारख्या आॅनलाईन गेमची सध्या सगळीकडे क्रेझ पहावयास मिळते आहे. मात्र अशा गेमच्या नादात पॉर्इंट कमविण्यासाठी तुम्ही तुमची माहिती शेअर करत असाल, तर जरा जपून. कारण अशा गेमवेड्यांकडून गुगल-फेसबुकच्या माध्यमातून डेबीट/क्रेडीट कार्डची माहिती घेत अहमदाबादच्या दुकलीने आंतराष्ट्रीय गेमसह पबजी, तीन पत्तीचे पॉर्इंट खरेदी केले आणि ते पॉर्इंट पुन्हा गेमवेड्यांना विकून ते लाखो रुपये मिळविल्याचे उघड झाले आहे.

मुलुंडमधील तक्रारदार वकील महिलेच्या खात्यातील पैशांतून आंतराष्ट्रीय मुंंगफ्राँग लब, आॅक्ट्रो इंक, तसेच पबजी, तीन पत्तीचे पॉर्इंट खरेदी करण्यात आले. जवळपास २० ते २५ वेळा त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले. तक्रारदारांनी याप्रकरणी थेट मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.पोलिसांच्या तपासात ते पॉर्इंट अहमदाबादच्या एका व्यक्तीच्या नावाने खरेदी केल्याचे समोर आले. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी अहमदाबादच्या महादेव नगर परिसरात धाव घेतली. तेथून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत आरोपीचे नाव समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी हितेश पटेल या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह नटूभाई ठाकूर (३९) यालाही अटक केली.

मुंबईसह राज्यभरातील तरुणांची फसवणूकहितेश पटेल आणि नटूभाई ठाकूर यांच्या चौकशीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी आतापर्र्यंत मुंबईसह राज्यभरातील विविध लोकांची अशाचप्रकारे फसवणूक केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? हे काम कधीपासून सुरू होते? त्यांनी आतापर्यंत किती जणांना फसविले आहे? याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली.