सेनेचा धक्का : पुण्यातील परिषद बारगळलीपुणे : पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तसेच मैदान देण्यास कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने नकार दिल्याने पुण्यात मुस्लीम आरक्षण हक्क परिषद भरवण्याचा बेत बारगळला आहे. आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तिहादूल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत बुधवारी ही परिषद होणार होती. अॅक्शन कमिटी, महाराष्ट्र आणि मूलनिवासी मुस्लीम मंचच्यावतीने गोळीबार मैदानावर बुधवारी संध्याकाळी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या परिषदेसाठी ओवैसी यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या कारणास्तव पोलिसांनी या परिषदेस परवानगी नाकारली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डानेही मैदान देण्यास नकार दिला. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी शनिवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते. प्रक्षोभक भाषण करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा संभव असून, ओवैसींच्या भाषणात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या तर सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळेच परवानगी नाकारली गेल्याचे समजते.
ओवैसींच्या सभेला परवानगी नाकारली
By admin | Updated: February 3, 2015 02:26 IST