शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पुण्यातील अग्निशमन जवानाची साता-यातील आगीवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 22:56 IST

सातारा येथील महामार्गानजीक असलेल्या लिंबगाव फाटा येथे हॉटेल सोहमच्या किचनमध्ये तेलाचा भडका होऊन मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली.

पुणे : सातारा येथील महामार्गानजीक असलेल्या लिंबगाव फाटा येथे हॉटेल सोहमच्या किचनमध्ये तेलाचा भडका होऊन मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. आग लागताच नागरिकांनी सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क करून मदतीची मागणी केली.परंतु लिंबगावापासून नगरपालिकेचे अग्निशमन केंद्राचे अंतर बरेच असल्याने मदत पोहोचण्यास वेळ लागेल, असे वाटल्याने तेथील नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी साता-याच्या आणेवाडीचा रहिवासी असलेला पुणे अग्निशमन दलाचा जवान राजीव टिळेकर हा नुकताच दिवाळीची सुट्टी नसल्याने थोड्या वेळाकरिता कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी गेला होता व हा जवान आग लागलेल्या ठिकाणांहून पाचच मिनिटांच्या अंतरावर होता. तिथे अचानक त्याला त्याच्या मित्राने फोन करून आग लागल्याची बातमी दिली. जवान टिळेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता आगीच्या ठिकाणी धाव घेतली.जवान टिळेकर हे हॉटेल सोहम येथे पोहोचताच त्यांना किचनमध्ये आग भडकत असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच त्यांना स्थानिक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मज्जाव केला. त्याचवेळी जवान टिळेकर यांनी पुणे अग्निशमन दलाचा मी एक जवान असल्याचा पुरावा म्हणून पोलिसांना ओळखपत्र दाखवत नगरपालिकेची फायरगाडी येईपर्यंत शक्य तेवढा प्रयत्न करू, असे सांगितले. जवान टिळेकर यांची ओळख पटताच पोलिसांनी त्यांना काळजी घेण्याच्या सूचना देत आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पुढे जाण्याची परवानगी दिली.जवान टिळेकर यांच्या धाडसाची व चतुराईची हीच वेळ होती. कारण ना फायरगाडी ना तिथे आग विझवण्याचे कुठलेच साधन... ! मग त्यांनी धाडसाने जोखीम स्वीकारत पुणे अग्निशमन दलाच्या त्राणाय सेवामहे या ब्रीदवाक्यानुसार आग लागलेल्या किचनमधील तीन सिलिंडर आत जाऊन एकट्याने बाहेर काढले. तसेच किचनने पेट घेतलेल्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बादलीच्या साह्याने पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणली. त्याचवेळी सातारा नगरपालिका व एका साखर कारखान्याची फायरगाडी दाखल झाली. या आगीत हॉटेलचे नुकसान झालेच. परंतु जवान टिळेकर यांनी दाखवलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. कारण जर वेळेवर तीन सिलिंडर बाहेर काढले नसते तर सिलिंडरचे स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. जवान राजीव टिळेकर यांनी केलेल्या कामगिरीने स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी त्यांचे कौतुक केले, पुणे अग्निशमन दलाकडे असे जिगरबाज जवान असल्याचेही त्यांनी नमूद केले.