शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

हेल्मेटअभावी महाराष्ट्रात गेले ५ हजारांवर बळी; सीटबेल्ट नसल्याने १,६९७ लोक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:01 IST

२०१८ची तुलना करता हेल्मेटविना जीव गेलेल्यांची संख्या २०१९ मध्ये वाढली आहे.

- अविनाश कोळीसांगली : जिवाला कवडीमोल ठरवत बेफिकिरीच्या वाटेने जाणाऱ्या लोकांच्या गर्दीत हेल्मट आणि सीटबेल्टविना महाराष्ट्रात दरवर्षी ७ हजारांवर लोक मृत्युमुखी पडत आहेत. देशातील एकूण अपघाती मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्यातील अपघातांची स्थिती गंभीर बनली आहे.महाराष्ट्र हायवे पोलिसांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये राज्यातील हेल्मेट न घातल्यामुळे एकूण ५ हजार ३२८ लोकांचा जीव गेला. हेल्मेट नसल्याने गंभीर जखमी झालेल्या लोकांची संख्या ६ हजार ४२७ इतकी आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या अपघातात बळींचे आणि गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१८ची तुलना करता हेल्मेटविना जीव गेलेल्यांची संख्या २०१९ मध्ये वाढली आहे. राज्यातील एकूण अपघाती मृत्यूचा विचार केल्यास जवळपास १० टक्के अपघात हे सुरक्षासाधनांचा वापर न केल्याने झाले आहेत. हेल्मेट न घातलेल्या चालकामुळे जवळपास १ हजार ६४६ सहप्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३ हजार ६८२ चालक ठार झाले आहेत.सीटबेल्ट न घातलेले ८१९ चालक, तर ८७६ सहप्रवासी ठार झाले आहेत. म्हणजेच चारचाकी चालकांपेक्षाही त्यातील सहप्रवासी अधिक ठार झाल्याची बाब समोर आली आहे.सुरक्षासाधनांविना अपघाताचे तुलनात्मक आकडेहेल्मटविनावर्ष         ठार      गंभीर जखमी२०१८    ५२५२    ६४२६२०१९    ५३२८    ६४२७सीटबेल्टविनावर्ष          ठार     गंभीर जखमी२०१८    १६५६    २९२१२०१९    १६९७    २७२०हेल्मेट नसल्याने झालेले अपघात३६% ठार४४% गंभीर जखमी २०% किरकोळ जखमी