पुणे : आॅल इंडिया मजलिस-ए इत्तिहादूल मुस्लिमीनचे (ए.आय.एम.आय.एम) संघटनेचे अध्यक्ष व खासदार असदुुद्दीन ओवैसी यांच्या गोळीबार मैदानातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांची नियोजित सभा कोंढव्यातील कौसरबाग मंगल कार्यालयामध्ये उद्या (बुधवार) सायंकाळी ५ वाजता घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली असून पोलिसांनी अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. उद्या दुपारपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.मूलनिवासी मुस्लिम मंच, अॅक्शन कमिटी यांच्या वतीने माजी न्यायमूर्र्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले, या परिषदेला ओवैसींना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. मात्र शिवसेनेने या कार्यक्रमात ओवैसीनी चिथावणीखोर भाषण केल्यास ही सभा उधळून लावू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. कॅन्टोमेंट बोर्डाने गोळीबार मैदान हे केवळ व्यावसायिक व विवाह समारंभासाठी दिले जात असल्याचे स्पष्ट करून आयोजकांना मैदानाचे ताबापत्र दिले नव्हते. त्यानंतर पोलिसांनीही या सभेला परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांची भेट घेतली. बंद सभागृहामध्ये सभा घेण्याची त्यांनी पोलिसांकडे तयारी दर्शविली आहे. त्यानुसार सभेसाठी कोंढव्यातील कौसरबाग मंगल कार्यालयाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती मुलनिवासी मुस्लिम मंच संघटनेचे पदाधिकारी अंजूम इनामदार यांनी दिली. (प्रतिनिधी)आता एमआयएमचे ‘टार्गेट’ संघभूमी!नागपूर : विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे दोन जागांवर विजय मिळविणाऱ्या आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलिमिनने (एमआयएम) राज्यात संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पुण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर नागपुरातही पोलिसांच्या परवानगीवरच या सभेचे भवितव्य ठरणार आहे़
ओवींसी पुण्यात सभा होणार?
By admin | Updated: February 4, 2015 02:23 IST