शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
5
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
6
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
7
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
8
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
9
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
10
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
11
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
12
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
13
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
14
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
15
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
16
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
17
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
18
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
19
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
20
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

बँकेची थकबाकी ६५७ कोटींवर

By admin | Updated: February 5, 2017 01:38 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेची बिगरशेतीसाठी दिलेली ६५६ कोटी ४२ लाख ८५ हजार रुपये इतकी रक्कम २७ संस्थांकडे थकली असून ती रक्कम भरणा होत नसल्याने बँकेपुढील अडचणी

- अरुण बारसकर, सोलापूर

जिल्हा मध्यवर्ती बँकेची बिगरशेतीसाठी दिलेली ६५६ कोटी ४२ लाख ८५ हजार रुपये इतकी रक्कम २७ संस्थांकडे थकली असून ती रक्कम भरणा होत नसल्याने बँकेपुढील अडचणी वाढत आहेत. याशिवाय शेती-पिकांसाठी दिलेली ६३८ कोटी इतकी रक्कमही ८० हजार शेतकरी भरण्यास तयार नसल्याने थकबाकीचा आकडा वरचेवर वाढतच आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने खासगी व संचालक मंडळाच्या उद्योगासाठी भरमसाट कर्ज दिल्याने बँकेसमोर आव्हानांचे डोंगर उभे झाले आहेत. घेतलेल्या कर्जाचे मुद्दल व व्याज भरण्याची मानसिकता या संस्थांची नाही. त्यातच दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचीही थकबाकी वाढली आहे. यंदा पाऊस चांगला पडला खरा, परंतु कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय झाल्याने बँकेची वसुली झाली नाही. दुसरीकडे नोटाबंदीमुळे तीन महिने बँकेची वसुली ठप्प झाली. शेतकऱ्यांकडून पैसे भरले जात नाहीत व कर्ज भरणा केला तर बँकेकडे देण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे संपूर्ण व्यवहार तीन महिन्यांपासून बंद आहेत. जिल्हाभरातील ८० हजार शेतकऱ्यांकडे डिसेंबर २०१६ अखेर ६३८ कोटी इतकी थकबाकी आहे. तर थकबाकीदार २७ संस्थांमध्ये बार्शीच्या आर्यन शुगरकडे सर्वाधिक १४५ कोटी ८७ लाख ६२ हजार थकबाकी आहे.डिसेंबर २०१६ अखेर थकबाकीशिवरत्न उद्योग समूह - १२५ कोटी ४४ लाख ४१ हजार शिवरत्न शिक्षण संस्था १२ कोटी २५ लाखपांडुरंग प्रतिष्ठान - २१ कोटी ३६ लाख शरद सह. सूतगिरणी - १८ कोटीसाखर कारखान्यांकडील थकबाकीसांगोला - ७३ कोटी ९२ लाख १३ हजार स्वामी समर्थ - ७५ कोटी ५६ लाख ६३ हजार आदित्यराज शुगर - ३८ कोटी १४ लाख ५६ हजार शंकर - ३७ कोटी २४ लाख ६७ हजार संत कूर्मदास - १९ कोटी ९५ लाख ३८ हजार इंडियन शुगर - १० कोटी ४९ लाखसंत दामाजी - १२ कोटी ५७ लाख