शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयबाहेरील रांगा संपेनात

By admin | Updated: March 31, 2017 06:32 IST

नोटाबंदीवेळी परदेशात असलेल्या नागरिकांना जुन्या पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या नोटा बदलण्यासाठी

मुंबई : नोटाबंदीवेळी परदेशात असलेल्या नागरिकांना जुन्या पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या नोटा बदलण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गेले दोन दिवस आरबीआयबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांग लावल्याचे पाहायला मिळाले. ही सवलत नोटाबंदीच्या काळात परदेशात गेलेल्या भारतीयांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असली तरी सर्वसामान्य नागरिकदेखील नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहत असल्याने आरबीआयबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने आरबीआयबाहेर नोटा बदलण्यासाठी नागरिक भलीमोठी रांग लावत आहेत. याआधी आरबीआयने जुन्या पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतची मुदत दिली होती. नोटाबंदीच्या काळात परदेशात असलेल्या नागरिकांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत नोटा बदली करता येणार आहेत. सोबतच सर्वसामान्य नागरिकांना प्रतिज्ञापत्रासह नोटा बदलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनिवासी भारतीयांसाठी मात्र ही मुदत ३० जूनपर्यंत आहे.स्वत:च्याच पैशांची चोरी!मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या एका नागरिकाने आरबीआयच्या नियमांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. घर खरेदी करण्यासाठी घरातील तिजोरीत पैसे जमा करून ठेवले होते. मात्र, जहाजावर असल्याने गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ बाहेरगावी होतो. माघारी परतल्यानंतर तिजोरीतील पैसे बदलण्यासाठी आरबीआयमध्ये आल्यानंतर पैसे बदलून देण्यास बँक प्रशासन नकार देत आहे. पुरावा म्हणून जवळ पासपोर्ट असला तरी केवळ परदेशात घेऊन गेलेल्या नोटाच बदलून मिळतील, असे उत्तर अधिकारी देत आहेत. त्यामुळे स्वत:जवळ कष्टाचे पैसे बाळगण्याचीही चोरी असल्याची खंत या नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.महत्त्वाची बाब म्हणजे आरबीआयला रांगेत उभे असलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे. कारण सर्वसामान्य नागरिकही रांगेत दिसत आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत रांगा लावल्यानंतर नोटा बदलून मिळत नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये आरबीआयविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.