शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रेल्वे भाडेवाढीविरोधात उद्रेक

By admin | Updated: June 23, 2014 23:10 IST

केंद्र शासनाने रेल्वेच्या भाडय़ात केलेल्या दरवाढीविरोधात देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पनवेल : केंद्र शासनाने रेल्वेच्या भाडय़ात केलेल्या दरवाढीविरोधात देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याच्या प्रतिक्रिया सोमवारी पनवेल परिसरातही उमटल्या. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकत्र्यानी आंदोलन करीत  विनातिकीट रेल्वेने प्रवास केलाच, त्याचबरोबर खारघर रेल्वेस्थानकावर रेल्वे रोखत तीव्र निदर्शने केले. मोदी सरकारविरोधात घोषणा देत कार्यकत्र्यानी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. 
नवीन सरकार आल्यावर एका महिन्यातच रेल्वे भाडय़ात सुमारे 14.2 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मासिक पासची रक्कमही दुपटीने वाढली आहे. पनवेल आणि सिडको वसाहतीतून हजारो जण नोकरी व्यवसायासाठी मुंबईला जातात. रेल्वेच्या तिकीटदरात वाढ केल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पनवेल-सायन महामार्गावरील प्रस्तावित टोल नाक्यावर स्थानिकांना सवलत मिळावी याकरिता स्वपक्षाच्या सरकारविरोधात लढा देणा:या ठाकूर यांनी आज रेल्वे दरवाढीविरोधातही आक्रमक पवित्र घेतला. सोमवारी सकाळी काँग्रेसचे कार्यकर्ते पनवेल रेल्वेस्थानकावर धडकले आणि काळे फलक लावून शासनाचा निषेध केला. ये देखो आ गये अच्छे दिन,  रेल यात्र महंगी अशा घोषणा देत पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. प्रशांत ठाकूर यांच्यासह कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, नगराध्यक्षा चारूशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी, मावळ लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर चौतमोल, प्रकाश बिनेदार, माजी आरोग्य सभापती प्रभाकर बहिरा, अरविंद सावळेकर, नगरसेविका नीता माळी, कल्पना ठाकूर यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी विनातिकीट प्रवास करून सविनय कायदेभंग केला. त्याचबरोबर खारघर येथे रेल्वे रोको करीत आपला निषेध नोंदवला. एक महिन्याच्या आत या सरकारने रेल्वे भाडेवाढ करीत जनतेचे खिसे कापण्यास सुरूवात  केली आहे. 
सर्वसामान्यांवर अन्याय करणारी ही दरवाढ आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही हे आंदोलन छेडले असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी यावेळी दिली. खोटी आश्वासने आणि भूलथापा देऊन भाजपा सत्तेवर आले असल्याचे या दरवाढीवरून सर्वाच्याच लक्षात आले आहे.  या मोर्चेच्या वेळी रेल्वे स्थानकात मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती व  सरकारच्या विरोधात मोठमोठय़ा घोषणा देण्यात आल्या. पनवेल व खारघर स्थानकात रेल रोको करण्यात आला. 
रेल्वे नेमकी कशासाठी थांबवली आहे हे नेमके न कळल्याने प्रवाशांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ोते. अनेक प्रवासीही या भाडेवाढीच्या निषेधार्थ आंदोलनात  सहभागी झाले होते. (वार्ताहर)