शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू

By सोमनाथ खताळ | Updated: June 12, 2025 10:23 IST

Pandharpur Wari: ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता  विठूनामाचा गजर करत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून १ हजार ७९ दिंड्यांतून १२ लाख ३४ हजार वारकरी ६ जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

- सोमनाथ खताळ बीड - ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता  विठूनामाचा गजर करत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून १ हजार ७९ दिंड्यांतून १२ लाख ३४ हजार वारकरी ६ जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने नियोजन करत प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर २०३ ‘आपला दवाखाना’ स्थापन करण्यात आला आहे. तसेच ४६ ठिकाणी १० खाटांचे तात्पुरते आयसीयूदेखील 

स्थापन केले आहे. आषाढी वारी,  पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी ५ व १९ मे रोजी बैठका झालेल्या आहेत.  आता १२ जून रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे याचा आढावा घेणार आहेत.

१,१५५ मनुष्यबळवारकऱ्यांच्या सेवेसाठी जवळपास १,१५५ मनुष्यबळाचे नियोजन केले आहे. यात १६१ विशेषतज्ज्ञ, २८६ डॉक्टर यांच्यासह नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, फार्मासिस्ट, आदींचा समावेश आहे. 

खासगीच्या १० खाटा आरक्षितशासकीय आयसीयू, आपला दवाखाना यांसोबतच पालखीमार्गावर असणाऱ्या प्रत्येक खासगी रुग्णालयातही १० खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना पुणे उपसंचालकांनी दिल्या आहेत. तसेच दिंड्यांसाेबत २९० आरोग्यदूत असणार आहेत. 

ठळक बाबी कोणत्या? आरोग्यदूत    २९०स्त्रीरोग तज्ज्ञ    १५मुक्काम स्थळी हिरकणी कक्ष    ३७दिंडीप्रमुखांना औषधी किट     ३५००रुग्णवाहिका    ३३१आयसीयू कक्ष    ४६आपला दवाखाना    २०३ 

पालखी सोहळ्याचे नियोजन झाले आहे. वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत, त्यांना आरोग्यसेवा तत्पर मिळावी, यासाठीच ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. - डॉ. आर. बी. पवार, उपसंचालक, पुणे

६६ जणांना अटॅक, ४२६ जणांना कुत्रा चावला सन २०२४ मध्ये १५ लाख १२ हजार ७७४ वारकऱ्यांवर उपचार केले होते. यांत ५,४६७ जणांना ॲडमिट केले होते. ४,९५० जणांना रेफर केले; तसेच २,६६७ जणांना सारी, २४,७९३ आयएलआय, १६,९२८ अतिसार, ७,८६०, जुलाब, ४४,९८२, ताप, ६६ हार्ट अटॅक, २८७ अपघातांत जखमी, ४२६ कुत्रा चावला, ११ सर्पदंश इतर १४ लाख ९ हजार २८७ रुग्णांचा समावेश होता.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीHealthआरोग्य